- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
नुकतीच दिवाळी झाली, तुळशीचं लग्नही लागले, पण त्याच्या आठवणी व प्रत्येक दिवसाचं वेगळेपण मनात ताजं आहे. भाऊबिजेच्या दिवशी आई- बहिणी अंगाला तेल लावतात, शरीरावर बसलेला मळ काढण्यासाठी अगदी दगडानं घासून आंघोळ घातली जाईल. ज्वारीच्या पिठाच्या थंड स्पर्शानं शरीरातला थकवा निघून जाईल, दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या सुवासिक तेलाच्या मालिशनं शरीराला एक चकाकी येईल.