मनमोराचा पिसारा : युगंधरा

निसर्ग आपल्या अनोख्या बहराने तेजाळलाय आणि मृदा चिंब पावसाळी न्हाऊन निघालीय.
मनमोराचा पिसारा : युगंधरा
Updated on

-गीता देव्हारे-रायपुरे

मनाला नकोय भपका, जो आत्मविश्वासाला हद्दपार करू पाहतो. मनाला नकोय ती सीमा ज्यात माझे शब्द अडकून पडतील. नकोय काहूर माजविणारी स्पर्शाची गणितं, तो अस्वस्थतेचा आडोसा जो आधार देऊनही पाठीत वार करेल आणि क्षणार्धात सारे कोसळेल कायमचे.

लेखणीने मौन धरलेय म्हणून तर तावं कोरी धवल. एकमत करून हट्टाला पेटलेयत दोघेही. ज्याने मन बेचैन आहे. निसर्ग आपल्या अनोख्या बहराने तेजाळलाय आणि मृदा चिंब पावसाळी न्हाऊन निघालीय. मात्र निसर्गाच्या मस्तमवाल ऋतूंचा सुद्धा संग मनाला नकोसा होतोय. आणि वाऱ्याने छेड काढणे देखील कसोटीच्या पारावर उतरल्यागत होतेय. असे का आणि कशासाठी होते आहे असे जेंव्हा लेखणीला विचारते तेव्हा ती फक्त हातातून तावांवर डोलते.

जणू, मौनाला प्रश्न विचारल्यावर उत्तर न देता आल्यासारखी. परंतु जिथे काळजी आणि भावनांच्या संवेदना असतात तिथे प्रेम जाणीवपूर्वक घिरट्या घालत असते. कळत नकळत माणसं गुंतून पडतात. आयुष्याचं कधी सोनं तर कधी सडा होतो. परंतु मी बेपर्वा आहे दोन्हींच्या बाबतीत. सोन झालं तर कुणाला आवडणार नाही..? पण सडा झाला तरी बेहत्तर..! पण हटणार नाही कारण माझ्या भावनांचं सामर्थ्य इतकंही तकलादू नाहीये. कळतंय मलाही की, माझ्या आतला गोंधळ तिला कळतोय. त्यासोबतच तिचाही गलबला मूक आक्रस्त आहे. गुन्ह्याची शिक्षा देताना...होय, गुन्हाच! मनाने अस्वस्थ होण्याचा गुन्हा..! श्वासांनी बेपर्वा होण्याचा गुन्हा.

मनमोराचा पिसारा : युगंधरा
भेट तुझी माझी स्मरते...

भावनांनी उर्मीचा गुन्हा आणि शब्दांनो, तुम्ही मूक होण्याचा गुन्हा..! या गुन्ह्याची शिक्षा देताना मौनाने गोंधळ माजवू नये असा दम दिला तरी मात्र मनाच्या डोळ्यांना गर्द भावनांचे हात शिवतात...काय करू..? पापण्यांच्या कडाही गाफील होऊन भिजतात... काय करू..? काय करू...की, विचारांचे दात किती हसतात एकादमात..! गर्द काळोखावर काचा फुटतात काळजाच्या आणि रक्तबंबाळ करू पाहतात धवल तावांना.

मनमोराचा पिसारा : युगंधरा
गप्पा ‘पोष्टी’ : नवं स्वातंत्र्ययुद्ध

मनाला ते धवल आकाश हवे. ज्यावर भावनांचे मेघ बरसतील संततधार! आणि शब्दांची पाखरं उंच झेपावतील. झेपावणाऱ्या पाखरांचे काय करायचे..? तावांना उगाच प्रश्न पडतात अडचणी आणणारे. नको त्या वेळी नको त्या बातांचे वेड नको ते! ही पाखरं युगंधरेला हाक देतील. जी प्रत्येक मनाच्या आत वास करतेय. ती ज्ञाता आहे या जगाच्या वास्तविकतेशी मात्र अलिप्त, विरक्त आहे विकृतींच्या संदर्भाने. जाणिवांची नेमकी जाणीव तिच्यात भिनवतील ही पाखरं. उंच झेपावतील तेव्हा युगंधरेला घेऊन अखंड विश्वाच्या हितोपदेशाची शृंखला निर्माण करतील ही पाखरं! ही युगंधरा मनामनाच्या गाभाऱ्यातून झरेल, धवलतेला रंग चढवेल मग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.