मनमोराचा पिसारा : फराळ आणि दिवाळी

 फराळ आणि दिवाळी
फराळ आणि दिवाळीsakal
Updated on

पूर्वी लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच फराळाचे आमंत्रण सुरु व्हायचे. आईबरोबर फराळाला गेलं की थोडा लॉस व्हायचा. कारण तिचं ठरलेलं वाक्य असायचं दोघींना एक प्लेटच द्या. ती संपवणार नाही. मनातून वाटायचं मला पूर्ण प्लेट हवी असताना ही उगाच नाही म्हणते.

दिवाळीच्या फराळाची ''मजा काही औरच आहे. फराळाच्या पंक्तीत करंजीला फार मान द्यावा लागतो. आता दिसायला आखीव रेखीव, सुंदर म्हटल्यावर ती भाव खाणारच नाही का! घरातल्या गृहलक्ष्मीने गहू ओलवले. त्याचा छान जात्यावर बारीक रवा दळला. सोबत जात्यावरच्या गाण्यांनी काम सोपं करायला हलकी हलकी मदत केली. रवा आणि कोंडा सुपाने विभाजित केला. आता रव्यापासून पिठ्ठीला वेगळं करायला वस्त्रगाळ करावी लागली.

 फराळ आणि दिवाळी
नागपूर : माध्यमबंदीच्या निर्णयावर कुलगुरूंची माघार

"कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई "नाक मुरडत पिठ्ठी बाहेर आली. साजूक तुपात पिठ्ठी भाजून घेतली." हलके हलके झोका देत मंदाग्नीवर गोऱ्या गोऱ्या पिठ्ठीला जास्त उष्णता सहन होत नाही. स्कीन टॅन होण्याची भीती म्हणूनच मंदाग्नीवर भाजून गार झाल्यावर पिठ्ठी साखर घालायची. आधीच तुपात भाजलेल्या पिठ्ठीचा सुगंध घरभर दरवळत असतो. आणखी भर म्हणून वेलची पावडर. ती स्वभावात जरा कोरडीच म्हणून साजूक तूप घालून तिला सांगितलं जातं. नाजूक रव्यात साजूक तुपाचे मोहन घातले.

दुधानी छान ओलावा आणून हे बंधन घट्ट झालं. अर्धा ते एक तास झाकून काहीवेळ एकांत घोषित. पुढील तयारीला आगेकूच केली. छान उंडा प्रेमानी मळून घेतला. पोळपाट बारीक लाटणे, घेऊन सज्ज. छोटी गोळी घेऊन पातळ पारी लाटली. पातळ इतकी असावी की डब्यात करंज्या भरल्यावर काढताना बघताच लक्षात यावं कुठली पिठ्ठीची कुठली तिळाची कुठली खव्याची इतकी पारदर्शक. कढईत तूप घालून तिला छान पोहता येईल इतके साजूक तूप हवे. हलक्या हलक्या हाताने मंदाग्नीवर करंजीला खूपच प्रेमानी आणि अलगद तळून घेणे. गार झाल्या की डब्याच्या स्वाधीन कराव्या. एकदा जर जिभेला चव लागली रे लागली मग काय ये दिल मांगे मोअर.

 फराळ आणि दिवाळी
नागपूर : सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अख्खे कुटुंब

लाडू भाऊ जरा खुशमिजाज. आपल्याच विश्वात रमलेले. कोणी पिस्ता द्या. बदाम द्या. काजू, किसमिस काहीही दिलं तर गुपचूप खाऊन टाकतात. अरे काहीच नसेल तर साधी वेलची पावडरही फस्त करतात. पण कधीच कोणाला रडवणार नाही. कुटुंबाला रिंगण घालणारी, स्वतःला मेन्टेन ठेवणारी कोण? अहो शेव...रतलाम ला राहणारी जरा जाड आहे पण बाकीच्या स्लीम, नाजूक, जरा चिवट आणि शिष्टच. बाराही महिने आपण तीला भाव देतो. तीचा अहंकार तर वाढणारच ना! असा आहे फराळाच्या परिवाराचा इतिहास. लाइफ हे असंच असतं...

एखाद्या प्लेटमधला अनारसा बघितल्यावर चटकन लक्षात यायचं. नवरदेव मारोतीवर रुसतो तसा हा कढईत रुसला असावा. त्याचे सगळे गुण मांडवापर्यंत येणाऱ्या नवरदेवासारखेच आहेत. आला तर पटकन येतो नाहीतर आटवून आटवून घेतो. फराळाच्या पंक्तीतील एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे चकलीबाई. हिला बघून माधुरीच्या गाण्याची आठवण होते हायरे मेरा घागरा. खरंच काटेदार गोल गोल घागरा असणाऱ्या चकलीभोवती दिवसातून कित्येक वेळा डब्याच्या आसपास आपण पिंगा घालतो.आणि ती तितकीच मटकते.

फराळाच्या परिवारातील छोटे नवाब म्हणजे शंकरपाळी. यांचं गोजिरवाणं रूप मोहातच पाडतं. खारे, गोड कोणतेही असले तरी वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. कधीच करताना सहसा कृती बिघडत नाहीत. आणि उगाचच तोरा दाखवून मिरवतही नाही. आदरणीय चिवडा म्हणजे छोट्या छोट्या दाणे, दळवा, पोहे, मुरमुरे, कढीपत्ता, कांदा अशा कितीतरी चिमुकल्यांचे एकत्र आणणारी शाळाच. ज्याच्या हातात हे सर्व येतात तो मग आपल्या कल्पनेतून आवडीतून त्यांना चिवड्याचा रूपात घडवतो.

-प्रणाली देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.