ऐतिहासिक प्रतिकृतींना गुल्हानेंचा ‘फोम’टच!

देशातील ऐतिहासिक व उत्तमोत्तम प्रतिकृती हुबेहुब साकारणारे कलावंत
ऐतिहासिक प्रतिकृतींना गुल्हानेंचा ‘फोम’टच!
ऐतिहासिक प्रतिकृतींना गुल्हानेंचा ‘फोम’टच!sakal
Updated on

धारदार सर्जिकल ब्लेडच्या सहायाने डॉक्टर्स अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजपणे पार पडतात. मात्र हेच शस्त्र वापरून फोमला कटिंग व कलाकुसर करून देशातील ऐतिहासिक व उत्तमोत्तम प्रतिकृती हुबेहुब साकारणारे कलावंत आहेत अरुण गुल्हाणे.

अरुण यांना लहानपणापासून ऐतिहासिक वास्तूंचे आकर्षण. पुस्तक, वर्तमानपत्रात येणारे ताजमहाल, दिल्लीचा किल्ला, राजस्थानातील राजांचे मोठमोठे महाल, गडकिल्ले तासनतास बघत. त्या वास्तूंची कलाकुसर निहारत त्याबद्दल ते विचार करायचे. आपल्याला अशाच प्रतिकृती बनवता येतील का असा त्यांच्या मनात विचार नेहमी येत असे. त्यादृष्टीने ते प्रयत्नही करत असत. दहाव्या वर्षांपासून त्यांनी घरांचे मॉडेल्स बनवायला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ऐतिहासिक वास्तुंकडे वळवला.

ऐतिहासिक प्रतिकृतींना गुल्हानेंचा ‘फोम’टच!
मनमोराचा पिसारा : फराळ आणि दिवाळी

दरम्यान ते सरकारी नोकरीवर लागले, लग्न झाले. नोकरी व कौटुंबिक जबाबदारीचा व्याप सांभाळत फावल्या वेळात त्यांनी आपला छंद जोपासला. सर्जिकल ब्लेड, फोम बोर्ड, वूड, पेपर, नेट, जाळी, डिंक अशा अनेक साहित्याचा वापर करत त्यांनी ताजमहाल बनवला. पाच बाय तीन फुटांत ही मनमोहक सौंदर्य कलाकृती त्यांनी चितारली. मुळ ताजमहलएवढीच कलाकुसर त्यांनी यात केली आहे. त्यांच्या घरी असलेला हा ताजमहाल पाहताना असे वाटते की आपण जणू मुळ ताजमहालच बघत आहोत. राजस्थानातील जोधपूरचे महाराज जसवंतसिंग यांचा महालही त्यांनी मोठ्या कौशल्याने साकारला आहे. अद्भुत, अद्वितीय असेच याचे वर्णन करावे लागेल. हूमायूंचा मकबरा पाहून त्यांच्या कलेची व सूक्ष्म निरीक्षणशक्तीची दाद दिल्याशिवाय राहावले जात नाही.

नागपुरातील अजब बंगला येथे त्यांच्या दोन कलाकृती जतन करण्यात आल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींसाठी इंडिया बुक ऑफ रेकार्ड्समध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

सध्या माझ्याकडे पाच ते सात कलाकृती आहेत. प्रत्येकाला किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागला. वयोमानाप्रमाणे आता पहिल्यासारखे काम होत नाही. घरी एक मोठा हॉल करून त्यात या कलाकृती कायमस्वरूपी जोपासण्याची इच्छा आहे.

-अरुण गुल्हाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()