संपूर्ण जगात सध्या जागतिक हवामान बदल, वाढते तापमान अशा विविध मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा होत आहे. त्याचे दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. वाढते कार्बन उत्सर्जन हा त्यातील प्रमुख घटक मानला जातो. त्याचे प्रमाण कमी कसे करता येईल, यावर जगभरात संशोधन सुरू आहे; पण कार्बनडाय आॅक्साईडपेक्षाही मिथेन हा धोकादायक घटक आहे.