- अॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com
माझ्या आईनं मला एक सुंदर पुस्तक भेट दिलं होतं. एका छोट्या प्रवासात असताना ते मी वाचायला सुरू केलं मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. अमेरिकेत मी एका छोट्या प्रवासात असताना मला एका कॅबची वाट पाहावी लागली. खूप वेळ वाट पाहिल्यावर एक कॅब मिळाली. मी त्यात बसलो. कॅबवाल्याने एक तमिळ गाणं लावलं होतं. ते माझं आवडतं गाणं होतं.
मीही त्या गाण्याच्या सुरात सूर मिसळत मोठ्या आवाजात गायला सुरुवात केली. माझं गाणं ऐकून तो खूश झाला. त्यानं मला विचारलं, की तुम्ही तमिळ आहात का? मी त्याला सांगितलं, ‘‘नाही. मी महाराष्ट्रात जन्मलो आहे, पण मनाने मी तमिळ आहे.