- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
हुलॉक गिब्बन प्राण्याला आसामी भाषेत ‘बोन मनुष’ म्हणजेच ‘वनात राहणारा मानव’ असे नाव आहे. त्याला माणूस म्हणून संबोधण्याचे कारण म्हणजे तो एप कुळातील माकड आहे. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ते आम्हाला पाहायला मिळाले. भारतातील १२ हजार गिब्बनपैकी तीन आमच्या समोर होते. गिब्बन परिवाराला पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले.