- राजू नायक, saptrang@esakal.com
मुंबई उच्च न्यायालयापुढे गेल्या आठवड्यात नग्नतेचा विषय आला. कलेच्या अभिव्यक्तीतील नग्नता हा विषय तसा अधूनमधून चर्चेत येत असतोच. काही वेळा सरकारी अधिकाऱ्यांच्या अतिसाहसीपणामुळे किंवा सनातन्यांच्या बीभत्सतेच्या स्वतःच्या संकल्पनांमुळं. न्यूटन सौझा व अकबर पदमसींच्या कलाकृतींमुळं हा वाद अधिकच चर्चिला गेला. या कलाकृतींवर सीमा शुल्क अधिकाऱ्यानं केवळ अश्लीलतेचा ठपका ठेवला नाही, तर ती चित्रं समाजासमोर येणं घातक असल्याचं सांगून नष्ट करण्याचं पाऊलही उचललं होतं.