राजवंश भारती : वाकाटक वंश

Vakataka Dynasty : केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर झाले आहेत.
25 caves in Ajantha were excavated by Vakatakas & Keval Narasimha, Ramtek
25 caves in Ajantha were excavated by Vakatakas & Keval Narasimha, Ramtekesakal
Updated on

लेखक : ॲड. सुशील अत्रे

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा आपल्याला दिसून येतात. नागपूरजवळ मनसर येथे मोठ्या प्रमाणात प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत. रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर झाले आहेत. (saptarang latest article on Vakataka dynasty)

वाकाटक वंशाचे मराठी मुलखाशी जवळचे नाते आहे. ते सातवाहनांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी म्हणावे लागतील. वाकाटक वंशाचा कालखंड इ. स. २५० ते ५२५ असा आहे. या वंशाचा आद्यपुरुष ‘विंध्यशक्ती’ हा होता. तो मूळचा कुठला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण, विंध्य पर्वताशी संलग्न नावावरून तो मूळचा मध्य भारतातील असावा.

त्याचे राज्य नोंद घेण्याइतके मोठे नव्हते. कालखंडही इ. स. २५० ते २७० एवढाच होता. त्याचा मुलगा प्रवरसेन-१ याने मात्र बराच मोठा भूप्रदेश ताब्यात घेतला आणि राज्य दक्षिणेकडे विस्तारले. त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केले. त्याने अश्वमेध यज्ञ चारवेळा केला, असा उल्लेख सापडतो. त्याची राजधानी ‘पुरिका’ अथवा ‘प्रवरपूर’ येथे होती.

हे गाव म्हणजे आजचे वर्धा जिल्ह्यातील ‘पवनार’ (विनोबा भावे यांचा आश्रम जिथे आहे ते) आहे, असे संशोधक मानतात. प्रवरसेनाने ६० वर्षे राज्य केले. प्रवरसेनाला चार मुले होती. त्यांच्यापैकी दोघांनी स्वतंत्र वंशशाखा स्थापन केल्या. त्यामुळे इ. स. ३३० पासून पुढल्या काळात वाकाटक राजवंश हा दोन स्वतंत्र नावांनी ओळखला गेला.

वत्सगुल्म शाखा :

वत्सगुल्म म्हणजेच आजचे वाशीम! प्रवरसेनाचा एक मुलगा सर्वसेन-१ याने आपला स्वतंत्र राज्यकारभार वाशीम येथून सुरू केला. सर्वसेन विद्या व कलेचा मोठा आश्रयदाता होता. स्वत: विद्वान होता. ‘हरिविजय’ या मूळ प्राकृत ग्रंथाचाही तो कर्ता होता. सातवाहनकालीन ‘गाथा सत्तसई’मध्ये काही गाथांची भर त्याने टाकली, असेही म्हणतात.

या वंशात पुढे विंध्यसेन, प्रवरसेन-२, सर्वसेन, देवसेन आणि हरिसेन तथा हरिषेण असे राजे होऊन गेले. हरिषेण हा या वंशातील सगळ्यात प्रसिद्ध राजा झाला. त्यानंतर आणखी दोन राजे अल्पकाळ होते. पण त्यांची नावे इतिहासाला निश्चित माहिती नाहीत. (latest marathi news)

25 caves in Ajantha were excavated by Vakatakas & Keval Narasimha, Ramtek
सह्याद्रीचा माथा : खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी गोपालन अन् बायोगॅस! पंतप्रधानांनी दखल घ्यावी असा प्रकल्प

नंदीवर्धन शाखा :

नंदीवर्धन म्हणजे आजचे ‘नगरधन.’ नागपूरजवळच्या रामटेकजवळ असलेले हे गाव. प्रवरसेन-१चा मुलगा ‘गौतमीपुत्र’ हा अल्पायुषी ठरला. त्यामुळे त्याचा मुलगा, प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन- १ याने आपले वेगळे राज्य स्थापन केले. या वंशाची राजधानी नंदीवर्धन येथे होती. ती नंतर पुन्हा प्रवरपूर (पवनार) ला हलवली होती.

रुद्रसेनाचा नातू, रुद्रसेन- २ हा एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. त्याचा विवाह गुप्तसम्राट चंद्रगुप्त-२ अर्थात, विक्रमादित्य याची मुलगी ‘प्रभावतीगुप्त’ हिच्याशी झाला होता. त्याचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात प्रभावतीगुप्ताने आपल्या अल्पवयीन मुलांतर्फे प्रतिनिधी म्हणून सुमारे २० वर्षे राज्य केले.

या काळात (इ. स. ३८५ ते ४०५) नंदीवर्धन वाकाटक हे जवळजवळ गुप्तांच्या अंकित होते. अनेक इतिहासकार या काळाला ‘वाकाटक-गुप्त काळ’ असेच म्हणतात. प्रभावतीची मुले दिवाकरसेन, दामोदरसेन आणि प्रवरसेन-२ अशी होती.

ही मुले लहान असतानाच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी आजोबा चंद्रगुप्ताने आपल्या दरबारातील एका विद्वान मंत्र्याला विदर्भात पाठवले होते. तो काही काळ रामटेकला राहिला होता. इथेच त्याने एक अजरामर संस्कृत खंडकाव्य लिहिले- ते म्हणजे ‘मेघदूत!’ त्या विद्वानाचे नाव महाकवी कालिदास!

या तीन राजपुत्रांपैकी दिवाकरचा लहान असतानाच मृत्यू झाला. दामोदर मात्र पुढे गादीवर आला. त्याच्यानंतर प्रवरसेन-२ (या शाखेतील) इ. स. ४२० च्या सुमारास राजा बनला. वाकाटक काळातील सगळ्यात जास्त ताम्रपट (सुमारे १७) याच्याच काळातील आहेत. कालिदासाच्या तालमीत तयार झालेल्या प्रवरसेनाने ‘सेतूबंध’ नावाचे मोठे काव्यही लिहिले.

ज्याची स्तुती पुढे बाणभट्टाने केली. या वंशातला अखेरचा राजा पृथ्वीषेण होता. त्याच्या मृत्यूनंतर नंदीवर्धन शाखा हरिषेणाने वत्सगुल्म शाखेत विलीन केली. वत्सगुल्म शाखेचा राजा हरिषेण त्याच्या राजकीय विजयांपेक्षा वेगळ्या कारणाने अजरामर झाला आहे. (latest marathi news)

25 caves in Ajantha were excavated by Vakatakas & Keval Narasimha, Ramtek
धपाटा

अजिंठा आणि वाकाटक :

वाकाटकांची स्थापत्य व शिल्पशैली विदर्भात जागोजागी आढळून आली आहे. नगरधन, पवनार, रामटेक, मनसर, वाशीम या जागांवर ती अधिक प्रमाणात दिसतेच; पण इतरही अनेक ठिकाणी वाकाटकांच्या खाणाखुणा दिसतात. नागपूरजवळ मनसर येथे प्रचंड मोठ्या प्रवरेश्वर शिवमंदिराचे अवशेष आहेत.

रामटेकचे ‘केवल नरसिंह मंदिर’ ही तर वाकाटक संस्कृतीची मोठी खूण मानली जाते. ‘केवल नरसिंह’ हे वाकाटकांचे आराध्य दैवत आहेच. पण, अलीकडच्या संशोधनात उघडकीला आलेली एक मोठी गोष्ट म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमधले वाकाटकांचे योगदान. याचे मोठे श्रेय तपस्वी अमेरिकन संशोधक वॉल्टर स्पिंक यांना जाते.

कित्येक वर्षे ‘अजिंठा’ या एकाच विषयाला त्यांनी वाहून घेतले होते. त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले आहे, की अजिंठा लेण्या खोदायला सातवाहन काळात सुरवात झाली असली, तरी गुंफा क्र. ९, १०, १२, १३ आणि १५-अ या सातवाहन कालीन आहेत, तर उर्वरित २५ गुंफा दुसऱ्या टप्प्यातील वाकाटक कालीन आहेत.

स्पिंक यांनी हे सिद्ध केले, की ‘शेकडो वर्षे ही लेणी खोदणे सुरू होते...’ हा गैरसमज आहे. वाकाटक नृपती हरिषेण याच्या एकट्याच्या आश्रयाखाली, त्याच्या कारकीर्दीत सुमारे इ. स. ४६० ते ४८० या वीस वर्षांमधेच दुसऱ्या टप्प्यातील २५ लेणी खोदली गेली. त्याचा महामंत्री वराहदेव याने लेणे क्र. १६ खोदून घेतले आहे.

तसा तेथील शिलालेखात उल्लेख आहे. हरिषेण इ. स. ४७७ मध्ये मरण पावला. पण लेण्यांचे काम नंतर दोन ते तीन वर्षे सुरू होते. बाकी काही विचारात घेतले नाही, तरी केवळ अजिंठा लेण्यांमुळे राजा हरिषेण आणि पर्यायाने वाकाटक वंश इतिहासात अमर आहेत.

(या लेखासाठी डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या ‘कोण होते वाकाटक?’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे.)

25 caves in Ajantha were excavated by Vakatakas & Keval Narasimha, Ramtek
अभी न जाओ छोडकर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.