लेखक : ॲड. सुशील अत्रे
दख्खन प्रांतावर सत्ता असणाऱ्या राजवटींपैकी पहिली मोठी राजवट सातवाहनांची; आणि नंतर विष्णुकुंडिनांची होती. त्यांच्या काळात संस्कृत आणि तेलुगू भाषेला चांगले दिवस होते. अनेक उत्तम तेलुगू ग्रंथ या काळात लिहिले गेले. विष्णुकुंडिनांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यावर गर्जना करणारा सिंह असे. तेच नाणकचित्र पुढे चालुक्यांनीही वापरले. या वंशातील राजे अतिशय धार्मिक व न्यायी होते, असे दिसून येते.
इसवी सनाच्या चौथ्या / पाचव्या शतकात दख्खनच्या पठारी भागात, वाकाटकांचा प्रतिनिधी म्हणून ‘विष्णुकुंडिन’ हा एक सामंत शासन करीत होता. कालांतराने त्याने स्वत:ला राजा म्हणून घोषित केले. ही घटना बहुधा इ. स. ३८० ते ४०० च्या आसपासची असावी. आर. सी. मुजूमदारांच्या मते विष्णुकुंडिन हे वंशनाव ‘विनुकोंडा’ या त्यांच्या मूळ ठिकाणावरून मिळाले. ते श्रीशैल्यम पर्वताजवळ आहे. श्री शैलमल्लिकार्जुन हेच विष्णुकुंडींचे कुलदैवत होते. त्याचा उल्लेख ताम्रपटांमध्ये ‘श्री पर्वतस्वामी’ असा केलेला आहे. (saptarang latest article on Vishnukundin Dynasty )