दृष्टिकोन : महिलांसाठी 100 टक्के शिक्षण हवेच

Marathi Educational Article : शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. मुलगी असो वा मुलगा, शिक्षणाला कोणतीही आडकाठी आणता कामा नये.
rajaram pangavhane
rajaram pangavhaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. मुलगी असो वा मुलगा, शिक्षणाला कोणतीही आडकाठी आणता कामा नये. शिक्षण हे आत्म्याचे प्रबोधन करते आणि माणसाला चूक व बरोबर, न्याय व अन्याय यात फरक करायला शिकवते. शिक्षण हे केवळ करिअरसाठी उपयुक्त म्हणून करण्याची बाब नसून, ते जीवनात दृष्टिकोन तयार करण्यासाठीची मूलभूत गरज आहे. लहानग्या मुली, युवती आणि सक्षम महिला वर्ग घडविण्यासाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

महिला समाजाचा आधारस्तंभ आहेत. समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रत्येक घटकाला सक्षम बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील महिलांच्या लोकसंख्येचे प्रमाण योग्य तसेच महिला प्रस्थापित, मजबूत आणि सुरक्षित असेल तेव्हाच राष्ट्र प्रस्थापित आणि मजबूत मानले जाते. स्त्री ही अशी मानली गेली आहे, जिला जीवन अर्थपूर्ण बनविण्याचे ज्ञान आणि तिचा तो स्वभाव आहे. श्वासोच्छ्‍वासासाठी ऑक्सिजन जितका आवश्यक आणि उपयुक्त, तितकेच स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे गरजेचे आहे. (100 percent education for women is must )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.