दृष्टिकोन : संतुलित दृष्टिकोनाने शोधा करिअरच्या वाटा

Latest Educational Article : सध्याच्या युगात करिअरच्या संदर्भात अनेक नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. खासकरून नव्या तंत्रज्ञानातील संधींमुळे भारतीय मुलांसाठी जगाची सर्व दालने खुली झालेली आहेत.
Latest Educational Article
Latest Educational Article esakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

सध्याच्या युगात करिअरच्या संदर्भात अनेक नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. खासकरून नव्या तंत्रज्ञानातील संधींमुळे भारतीय मुलांसाठी जगाची सर्व दालने खुली झालेली आहेत. मात्र, योग्य मार्गाची निवड करताना मूलभूत क्षमतांची आणि आवडीची संतुलित जाणीव व दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण केले, तर निश्चितच भारतीय युवा जगावर बुद्धीच्या माध्यमातून सत्ता गाजवू शकतात, एवढ्या मोठ्या शक्यतांची निर्मिती सध्याच्या काळात होऊ घातलेली आहे. कष्ट आणि सातत्य असेल तर यश मिळविणे आपल्या देशातील युवकांसाठी फार कठीण नाही, हे निश्चित...

तंत्रज्ञानातील पुढच्या वाटांमधील सर्वांत आकर्षक आणि चर्चेतील क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय होय. या क्षेत्रात मागणी असलेल्या उच्च पगाराच्या अनेक नोकऱ्या जगभर उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तुम्हाला एआय क्षेत्रात यायचे असेल आणि तुमच्याकडे योग्य कौशल्ये, अनुभव असेल किंवा ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर या क्षेत्रात अमर्यादित संधी उपलब्ध आहेत. (latest article on Find career opportunities with balanced approach)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.