लेखक : राजाराम पानगव्हाणे
भविष्याचा वेध घेणारे पालक, शिक्षक, शिक्षण संस्था यांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. भविष्याच्या उदरात काय दडले आहे, हे जे ओळखू शकतील, तेच खऱ्या अर्थाने सशक्त व समृद्ध जीवन जगू शकतील. आज जगभरात विविध गोष्टींचा धांडोळा घेतला जात आहे. आयुष्य अधिक सुखकर करण्याच्या दिशेने सगळ्या साधनसामग्रींचा अपव्यय होताना दिसतो.
पण, त्यातल्या त्यात अधिक सक्षम होण्याचे मार्ग शोधणे ही काळाची गरज आहे. संगणक क्षेत्रातील सर्वच क्षेत्रांना आजच्या घडीला मागणी आहे, असे ठामपणे सांगता येणार नाही. परंतु, प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक संगणकासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे क्षेत्र म्हणजे कोडिंग आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी अधिकाधिक कोडिंग साक्षर कशी होईल, याची तजवीज आतापासून करायला हवी. (Saptarang latest article on New Era Now of Coding Literacy)