लेखक : राजाराम पानगव्हाणे
बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत बदल करून ती अधिकाधिक कौशल्याधारित करण्यावर जगातील अनेक देशांनी भर दिलेला आहे, त्यामुळे ते वेगाने विकसित होत आहे. आपल्याकडे त्याला आताशी सुरवात झालेली आहे, त्यामुळे जगाच्या बरोबरीने जाण्यासाठी या शिक्षणपद्धतीची पल्याकडील गति वाढायला हवी, तसेच व्यवसायनुरूप शिक्षणपद्धतीवर अधिक भर द्यायला हवा. चीनने खूप आधी आपल्या शिक्षणपद्धतीत कौशल्यविकासाला प्राधान्य देत काळनुरूप बदल केल्याने आज चीन शिक्षणात अतिउच्च दर्जा राखू शकला आहे. (Skill development is core of Chinese education)