लेखिका : तृप्ती चावरे- तिजारे
आपण जे बोलतो, त्याचं बंधन आपल्या विचारांवर येतं आणि त्यानुसार शुद्ध किंवा अशुद्ध विचार घडत जातो. उच्चार आणि विचार एक झाले, की त्याचं बंधन आपसूकच आपल्या आचारावर येतं, आपण जे बोललो, जसा विचार केला, तसंच वागलं पाहिजे, हे नैतिक बंधन ! या बंधनाचा धागा भाषेपासून सुरू होतो आणि भाषेपाशीच थांबतो. हे भाषाबंधन झुगारलं तर कुठलाही आचार हा दुराचार ठरून व्यक्तिमत्त्व बिघडू लागतं; तर हेच भाषाबंधन शुद्धतेकडून पाळलं तर कुठलाही आचार हा सदाचार होऊन व्यक्तिमत्त्व घडू लागतं. घडण्या-बिघडण्याच्या या खेळात, मुख्य नायिकेची भूमिका करते ती मातृभाषा! (saptarang latest article on Language communication of Mother language culture)