लेखक : ॲड. सुशील अत्रे
'माळवा’ प्रांत म्हणजे मुख्यत्वे मध्य प्रदेश आणि काही भाग राजस्थान हा भूभाग. या भागावर राष्ट्रकुटांनी प्रतिहारांचा पराभव करून सत्ता ताब्यात घेतली. त्यांचे प्रदेशाधिकारी म्हणून परमार कामकाज करीत होते. राष्ट्रकूट गोविंद-३ याने ‘राज्यपाल’ म्हणून परमार कृष्णराज अथवा उपेंद्र याला नेमला होता. त्याच्यानंतर वाक्पतिराज, वैरीसिंह असे शासक आले. पण परमार वंशाचे राज्य खऱ्या अर्थाने सुरू झाले, ते ‘सियक’ याच्यापासून...
ह रसोलचा ताम्रपट हा परमार वंशाचा सगळ्यात जुना उपलब्ध पुरावा आहे. तो ताम्रपट सियकाचा आणि इ. स. ९४९ चा आहे. त्यात सियकाने कोणा एका ‘अकालवर्षाचा’ उल्लेख करून नंतर ‘तस्मिन् कुले...’ असे स्वत:बद्दल म्हटले आहे. ‘परमार’ हेदेखील एका प्राचीन राजाचेच नाव आहे, असे म्हणतात. काही संशोधकांच्या मते परमार हे राष्ट्रकुटांचे वंशज होते, काहींच्या मते ते परकीय मुळाचे होते. तेव्हा एक दंतकथा अशीही रूढ होती, की वसिष्ठ मुनींनी अर्बुद (अबू) पर्वतावर पेटविलेल्या एका अग्निकुंडातून परमार वंश सुरू झाला. (latest article on Parmar clan )