सोयीसाठी खेड्यांकडे, उच्च शिक्षणाचे वाभाडे

Educational Article : अतिशय बिकट आणि अस्वस्थ परिस्थितीतून आजची उच्चशिक्षण व्यवस्था प्रवास करीत आहे. निव्वळ गुणांच्या हव्यासापोटी विद्यार्थी आणि पालक कोणत्या थराला जात आहेत, याची कल्पना न केलेलीच बरी.
Village college going students
Village college going studentsesakal
Updated on

"विविध शिष्यवृत्ती, योजना आणि उच्चशिक्षित प्राध्यापक असतानाही आज अनेक विद्यार्थी केवळ सोयीसाठी ग्रामीण भागातील विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. नियमित महाविद्यालयाचे बंधन नाही, केवळ परीक्षेला जाणे बस्स एवढीच सोय करून हे विद्यार्थी शहरात विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. यातून महाविद्यालयीन जीवनात मिळणाऱ्या शिक्षणापासून आणि एकूणच महत्त्वाच्या टप्प्यावरील शैक्षणिक विकासापासून ते वंचित राहतात, शिवाय गैरमार्ग अनुसरून स्वतःचे भवितव्य धोक्यात घालत आहेत. सुजाण पालकांनी आणि एकूणच सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. "

- प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी (आबड-लोढा जैन महाविद्यालय, चांदवड)

(Villages for convenience access to higher education)

अतिशय बिकट आणि अस्वस्थ परिस्थितीतून आजची उच्चशिक्षण व्यवस्था प्रवास करीत आहे. निव्वळ गुणांच्या हव्यासापोटी विद्यार्थी आणि पालक कोणत्या थराला जात आहेत, याची कल्पना न केलेलीच बरी. आज अनेक विद्यार्थी नामांकित महाविद्यालय आणि शहरातील महाविद्यालये सोडून खेड्यापाड्यांत कुठेतरी आडमार्गावर असलेल्या गैरसोयीच्या महाविद्यालयात (जिथं कोणतीही शैक्षणिक सुविधा व व्यवस्था नाही केवळ महाविद्यालय म्हणायला आहेत) केवळ आणि केवळ परीक्षेसाठी जाऊन आणि येणकेणं प्रकारे उत्तीर्ण होण्याची हमी घेऊन प्रवेश घेत आहेत.

शहरांमध्ये वेगवेगळे व्यावसायिक शिकवण्या classes लावून हे विद्यार्थी नीट, सीईटी तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय, इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेचे वर्ग लावून घेतात. आडमार्गावर असलेल्या या महाविद्यालयांमध्ये त्यांना तयार प्रमाणपत्र आणि परीक्षेला अनुकूल असे वातावरण मिळत असल्यामुळे अशा महाविद्यालयांमध्ये भरगच्च प्रवेशप्रक्रिया पूर्ण होताना दिसत आहे. सर्वांत भयानक गोष्ट म्हणजे अनेक प्राध्यापक आणि शिक्षक आपल्या पाल्यांची अशाप्रकारे सोय करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

मी ३५ वर्षांपासून शारीरिक शिक्षण संचालक आणि सध्या चांदवड येथे प्राचार्य म्हणून काम करत असताना बदललेली ही सर्व भयानक परिस्थिती जवळून बघत आहे. चांगल्या संस्था, प्रामाणिकपणे आणि तळमळीने अध्यापन करू पाहणारे प्राध्यापक आजही आहेत. आज नवीन शैक्षणिक धोरण सर्वत्र राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला हा सर्व तत्त्वं आणि अनैतिक प्रकार दिवसेंदिवस वाढताना पाहून विद्यार्थ्यांच्या भविष्याची मोठी चिंता वाटू लागली आहे.

वाममार्गाने आणि अशा पद्धतीने येणारे विद्यार्थी आयुष्यात कोणत्या धडा घेतील आणि कोणती नैतिकता जगाला सांगतील? यात बोटावर मोजणारे विद्यार्थी सोडले, तर या प्रकारातून काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. तो विद्यार्थी ना महाविद्यालयाचा राहतो, ना त्या शिकवण्यांमधून काही देदिप्यमान कामगिरी करतो. (latest marathi news)

Village college going students
‘वन नेशन वन गोल्ड रेट’ स्वप्नवतच

पालकांची जबाबदारी मोठी

आदर्श परिस्थितीत पालकांची फार मोठी जबाबदारी आहे, की विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये नियमित गेला पाहिजे. महाविद्यालयाच्या प्रशासनाची किंवा प्राध्यापकांच्या संदर्भात काही तक्रार असेल, तर ती स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली पाहिजे. क्लासेस गरजेनुसार लावावेत; परंतु महाविद्यालयातील अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. कॉपी करून आणि ओळख-वशिल्याने आपल्या मुलांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करणे हे अतिशय गंभीर आहे.

कोरोनाकाळात आभासी शिक्षण पद्धतीमध्ये अनेक पिढ्या सरळसरळ पुढच्या वर्गात ढकलल्या गेल्या. महाविद्यालयात आज ही मुले आल्यानंतर त्यांना पायाभूत संकल्पनासुद्धा समजलेल्या दिसत नाहीत. भाषेच्या लेखन कौशल्याच्या बाबतीत तर आनंदीआनंद आहे.

शासन आणि उच्चशिक्षण विभाग विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विविध प्रकारच्या सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करूनही त्याकडे दुर्लक्ष करून विनाअनुदानित अशा सोयीच्या महाविद्यालयांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून स्वतःचे नुकसान आणि शासनाची दिशाभूल करीत आहे. शासनानेही या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कोरोनातील पिढीची अधोगती

‘नॅक’ने महाविद्यालयांचे मूल्यांकन होऊ शकते. परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याचे मूल्यांकन कोण करेल? असा यक्षप्रश्न आज शिक्षण क्षेत्रात चर्चेला जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनाकाळात माध्यमिक आणि प्राथमिक वर्गाला असलेली पिढी पुढे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयात प्रवेश घेताना मी जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांची शैक्षणिक अधोगती पाहून मन सुन्न होते. साधे अर्जसुद्धा विद्यार्थ्यांना मराठीत लिहिता येत नाही, इंग्रजी तर दूर राहिली.

त्यामुळे मी आज पालकांना कळकळीचे आवाहन करतो, की ग्रामीण भागात अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत. परंतु त्या बोटावर मोजता येतील एवढ्या आहेत, त्या सोडल्या तर अन्य शैक्षणिक संस्था या गैरमार्गाला खतपाणी घालत आहेत आणि त्याद्वारे आपण आपल्या मुलांचे गुणांकन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. चांगल्या शैक्षणिक संस्था आजही सुजाण पालक आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. 

Village college going students
अभिनयाचं विद्यापीठ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.