लेखक : राजाराम पानगव्हाणे
पाणी हा विषय मानवाच्या सर्वांगीण विकासाला व्यापून राहिलेला विषय आहे. पाणी आणि विकास ही परस्परपूरक बाब आहे. सृष्टीच्या आगीम व्युत्पत्तीपासून ते तंत्रज्ञानाच्या विविधांगी दिशेने चालणाऱ्या मानवाच्या वाटचालीत पाण्याचा मोठाच वाटा आहे. किंबहुना मनुष्याची प्रगती पाण्यामुळेच झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, एवढे मानवी जीवनात पाण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. (saptarang latest marathi article on Conserve water resources)
संबंध पृथ्वीतलावर ७० टक्के क्षेत्र पाण्याने व्यापले असून, त्यातील एक टक्क्यापेक्षाही कमी वाटा हा गोड्या पाण्याचा आणि पर्यायाने मनुष्याच्या दैनंदिन उपयोगितेकरिता योग्यतेचा आहे. नदी, सरोवरे, तळे, झरे, विहिरी, भूजल यांनी तो व्यापला आहे. मानवी संस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतसा पाण्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होत गेला. म्हणजे जसे पाण्याचा मुख्य उपयोग हा पिण्यासाठी आहे हे ज्ञात आहे. त्यानंतर शेती, औद्योगिक विकास यासाठीही तो होत गेला.
पाण्याचा वापर अन् लोकसंख्या
आपल्याला माहीत आहे, की पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे तीनचतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. ९६ टक्के जागतिक जलस्रोत केवळ महासागर आणि समुद्रांमधून येतात. परंतु वापरण्यायोग्य गोड्या पाण्याचे एकूण प्रमाण सुमारे २.५ टक्के आहे. साठवलेले भूजल फक्त ३० टक्के आहे. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे, की काही वर्षांत जगातील लोकसंख्येने ६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
लोकसंख्येत वाढ झाल्याने पाण्याचा वापरही ५०० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी हे केवळ मानवांसाठीच नाही, तर वनस्पती आणि प्राण्यांसाठीही एक आवश्यक आहे, म्हणूनच त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. किंबहुना, ऐतिहासिकदृष्ट्याही मानवाने धरणे बांधून, ठिबक सिंचनाचा वापर करून, जलसंचय करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
जलस्रोतांचे संवर्धन करा
अनेक जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत आपण अजूनही सजग नाही. पाणी वाचवण्यासाठी आपण आताच काही केले नाही, तर पुढच्या पिढ्यांना शुद्ध पाणी मिळू शकणार नाही. योग्य नियोजन केल्यास गाव किंवा शहरात अनेक ठिकाणी नियमितपणे पाणीपुरवठा करता येतो.
जर प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन कामासाठी भूजलाचा वापर कमीत कमी किंवा अनुकूल करून जलसंधारणासाठी योगदान देण्यास सुरवात केली तर त्याचा परिणाम अधिक होईल. आज जलव्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे होत आहे. जलव्यवस्थापनामध्ये अनेकदा धोरणे बदलणे समाविष्ट असते, जसे की भूगर्भातील पाण्याचा निचरा करणे किंवा वेगवेगळ्या उद्देशांसाठी पाण्याचे वाटप करणे. (latest marathi news)
पाणी व्यवस्थापनाचे मार्ग
पाणी हे सर्वांत महत्त्वाचे नैसर्गिक स्त्रोत आहे. वर्षानुवर्षे अनेक कारणांमुळे पाणवठ्यांसह नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत आहे. जलसंधारणासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याकडून काय करता येईल, यावर चर्चा करूया. जलस्रोतांचा इष्टतम वापर विकसित करणे, नियोजन करणे, व्यवस्थापन करणे आणि वितरण करणे ही क्रिया जलसंसाधन व्यवस्थापन म्हणून परिभाषित केली जाते.
ओलसर जमीन ज्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती आहेत, त्या जास्त आर्द्रतेवर अवलंबून असतात. खराब पाणी व्यवस्थापनामुळे सुरक्षा आणि आर्थिक विकास दोन्ही धोक्यात आले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर पाण्याचा प्राधान्य धोरणाचा मुद्दा बनत आहे.
जलसाठे दिवसेंदिवस प्रदूषित
जलगुणवत्तेचे व्यवस्थापन करीत असताना दोन महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक तर आपणास वापरण्यायोग्य असलेला जलसाठा आणि तो टिकवून ठेवणे. दुसरे म्हणजे तो प्रदूषित होऊ नये, यासाठी आधीच सर्व उपाययोजना करणे. प्रदूषित जलस्त्रोत पुन्हा मूळ स्थितीत म्हणजेच प्रदूषण मुक्त करणे हे अत्यंत खर्चिक, किचकट, वेळखाऊ व प्रसंगी अशक्यप्राय: असे काम असते.
परंतु आजही जगभरातील जलसाठे हे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. प्रदूषण म्हणजे काय? तर कुठल्याही नैसर्गिक संरचनेत झालेला बदल म्हणजे प्रदूषण होय. हे जलसाठे, पिण्यायोग्य पाणी, प्रक्रियेनंतरचे सांडपाणी, शेतीव्यवस्थेसाठी आवश्यक असणारे पाणी या सर्वांचेच मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार ती असावयास हवी. परंतु जगभरातील शास्त्रीय अभ्यासकांच्या नोंदी असे मत देतात, की जगभरातील जलसाठे हे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रदूषित होत आहेत. (latest marathi news)
शक्य तेथे पाण्याचा साठा करा
साखर तलावाच्या माध्यमातून जलविरोधी खंदक कठीण खडकापर्यंत न नेता मध्येच थांबविला जातो. खंदक व खडक यांच्यामधून पाणी पाझरून जमिनीत राहते; त्यामुळे ओढा प्रवाहित राहतो. जवळच्या विहिरींचे पाणी टिकते. तलावातील पाणी जनावरांना उपयोगी पडते.
गावतळ्यांमध्येसुद्धा याचप्रमाणे पाणी साठविता येते. काही ठिकाणी त्याच जागेवर खणून त्याच मातीचा खालच्या बाजूला भराव टाकून तलाव केला जातो व पाणी साठविले जाते. पाण्याचा साठा ज्या-ज्या ठिकाणी करता येईल, त्या-त्या ठिकाणी तो केला पाहिजे.
डोंगर उतारावर एखाद्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरू होतो. या प्रवाहावर वा नाल्यावर प्रवाहाच्या मध्यापासून वा सुरवातीपासून ते खालपर्यंत काही अंतरावर बांध टाकले जातात. हे बांध माती-मुरमाचे किंवा विटा-वाळू सिमेंटही असू शकतात. तो लघुपाटबंधाऱ्यापेक्षा लहान असतो व त्याला कालवे नसतात.
शेततळे अन् कोल्हापूर बंधारा
‘शेततळी’ तयार करण्यासाठीही वरीलप्रमाणेच संकल्पना वापरली जाते. जागेवरच उपलब्ध असणारे खडक, गोटे, दगड, माती, मुरूम हे साहित्य तसेच पॉलिथीन कागद वापरून असे तलाव तयार केले जातात. याचा उपयोग पिकाला एखादे संरक्षक पाणी देण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी या दृष्टीने होऊ शकतो. नाल्याचे पात्र खोल आहे व पाया चांगला आहे, अशा ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधता येतात. त्यांना उंचीचे बंधन नसते. या पद्धतीत ते चार फूट उंचीचेही असू शकतात. मोठा पूर येऊन गेल्यानंतरच या ठिकाणी पाणी अडविले जाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.