- विश्वास पाटील, authorvishwaspatil@gmail.com
नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील आनंद हर्डीकर यांचा लेख वाचला. अनुज धर यांनी या विषयावर लिहिलेल्या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे हर्डीकरांनीच संपादन केले आहे.
सुभाषचंद्रांच्या त्या विमानाला अपघात झालाच नाही. ते जिवंत आहेत. ते कोणाला रशियात तर कोणाला चीनमध्ये आढळून आले. ते नेहरूंच्या अंत्यदर्शनाला गुप्तपणे उपस्थित असल्याचे फोटोच कोणी दाखवले. अगदी नेताजींच्या तोंडवळ्याचा हा माणूस. प्रत्यक्षातील कंबोडियाच्या वीरा धर्मवीरा नावाच्या या बौद्ध भिक्खूने तर खोसला कमिशन पुढे हजर राहून स्वत:ची ओळख सांगितली होती.