- रणजीत दळवी, sakal.avtaran@esakal.com
न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेतील पराभवाची मीमांसा करताना निष्कर्ष निघतो तो म्हणजे, आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना एक प्रकारे नोटीसच जणू दिली आहे. उरली-सुरली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, हे त्यांना कोणी तरी समजावले पाहिजे खरे. पाकिस्तानला लोळविणाऱ्या बांगलादेशला आपण जमीनदोस्त केले. न्यूझीलंडला श्रीलंकेने झोडपले. तेव्हा सहजच त्यांचा पाडाव करू, अशा भ्रमात आम्ही होतो. त्याची किंमत आपण मोजली.