- संदीप कामत, sandip.kamat@gmail.com, @sankam
‘पुढचं जागतिक महायुद्ध कशासाठी होईल’ असा प्रश्न कुणी विचारला, तर अगदी काही वर्षांपूर्वी बरेच लोक देशसीमा, पेट्रोल किंवा पाणी असं म्हणाले असते. पण गेल्या दशकामध्ये एक छुपं महायुद्ध आधीच सुरू झालं आहे आणि ते आहे ‘चिप वॉर’.
आज आपल्या भवती सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे - कॉम्प्युटर्स, स्मार्टफोन्स, कार्स, कॅमेरे, सोशल मीडिया ॲप्स अँड आता अगदी ए-आय सुद्धा. हे सगळं ज्याशिवाय अजिबात चालू शकत नाही त्या म्हणजे ‘सिलिकॉन चिप्स’! अगदी लहान मुलांच्या खेळण्यांपासून अतिभयंकर अण्वस्त्रांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये चिप्स आहेत.