सोनेरी स्वप्नं : उकिरड्यातला सुगंधी केवडा

‘नितीन, मस्त पाऊस सुरू झालाय. तुझ्या घरी येतीये मी. तुझ्या घराचा परिसर अफाट सुंदर आहे. मी येताना वाइन, बिअर आणि चिकन कबाब आणतीये.
Kevada
KevadaSakal
Updated on
Summary

‘नितीन, मस्त पाऊस सुरू झालाय. तुझ्या घरी येतीये मी. तुझ्या घराचा परिसर अफाट सुंदर आहे. मी येताना वाइन, बिअर आणि चिकन कबाब आणतीये.

‘नितीन, मस्त पाऊस सुरू झालाय. तुझ्या घरी येतीये मी. तुझ्या घराचा परिसर अफाट सुंदर आहे. मी येताना वाइन, बिअर आणि चिकन कबाब आणतीये. सॉलिड पार्टी करू,’ असं म्हणत कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका हायफाय मैत्रिणीनं फोन ठेवला. शनिवारी रात्री ती घरी पोहोचली. बायकोनं जंगी तयारी करूनच ठेवली होती. रात्री गप्पा रंगल्या. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. कँडल लाइट डीनर चालू झाला. घरात केवड्याचा सुगंध दरवळत होता. तशी ती मैत्रीण म्हणाली, ‘अरे, येताना मला सिग्नलला केवड्याचा गजरा विकणारी मुलगी दिसली. पण, तिच्याकडून गजरा घ्यायचं माझ्या खूप जिवावर आलेलं. किती दिवस अंघोळ केली नसंल तिनं काय माहिती. कपडे खराब, हाताची नखं वाढलेली. कारची काच उघडायलाही नको वाटलं.’

आम्ही दोघांनी होकारार्थी मन डोलवली आणि एकामागोमाग एक ग्लास संपू लागले. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मॅडम बेडरूममध्ये झोपून होत्या. दुपारी उठल्या आणि घराभोवतीच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ लागल्या. हिरवंगार शेत, पाटातलं थंडगार पाणी, रिमझिमणारा पाऊस, दिवेघाटात उतरलेले ढग, लांबपर्यंत दिसणारा हिरवागार परिसर अनवाणी फिरत मनात साठवू लागल्या. तोच आम्हाला एका केवड्याच्या फुलाचा सुगंध आला म्हणून आम्ही थबकलो. एका उकिरड्यामध्ये केवड्याचं झाडं होतं आणि त्याला भरपूर देखणी फुलं लगडली होती.

क्षणाचाही विचार न करता कोथरूडची पोरगी दगडांवर पाय ठेवत त्या केवड्याच्या झाडापाशी पोहोचली आणि तिनं फुलं तोडायला सुरुवात केली. मी तिला म्हणालो, ‘काल तुला सिग्नलला भेटलेली मुलगी या उकिरड्यापेक्षा तर कमीच घाण असेल ना?’

ते वाक्य बरोबर तिच्या काळजाला लागलं. तोडलेली फुलं तिनं घरी आणली आणि रात्री आम्हाला बाय करत कोथरूडला निघाली. घरी गेल्या गेल्या तिनं सिग्नलवाल्या मुलीसोबतचा फोटो पाठवला. फोन करून म्हणालो, ‘घेतली का तिच्याकडून फुलं?’ तिनं स्मित करत उत्तर दिलं. ‘घेतली नाही, माझ्याकडची केवड्याची फुले तिला दिली. तिचं आयुष्यही केवड्यासारखं सुगंधी व्हावं म्हणून. कदाचित उकिरडा दिसला नसता, तर मलाही माझ्या मनातल्या वैचारिक उकिरड्याची कधीच जाणीव झाली नसती.’

भर पावसात तो उकिरडाही तलावाहून देखणा वाटू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.