अश्लीलता नव्हे; अभिव्यक्ती !

अश्लीलता नव्हे; अभिव्यक्ती !
Updated on

अरविंद हाटे

गेल्याच वर्षी अश्लीलतेच्या आरोपाखाली जप्त करण्यात आलेल्या प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा आणि अकबर पदमसी यांच्या अनेक कलाकृती नष्ट करण्यापासून सीमाशुल्क विभागाला रोखणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जारी केला. वादग्रस्त कलाकृतींमध्ये सुझा यांनी बनवलेल्या चार कामुक रेखाचित्रांचा एक फोलिओ समाविष्ट आहे. त्यापैकी एकाचे शीर्षक आहे ‘लव्हर्स’ आणि पदमसी यांनी बनवलेल्या इतर तीन कलाकृतींमध्ये ‘न्यूड’ नावाचे रेखाचित्र आणि दोन इतर छायाचित्रे आहेत. वास्तविक पाहता, सामान्यत: आपण आधुनिक तंत्र, आधुनिक विचार, आधुनिक कविता-साहित्य, आधुनिक संगीत, आधुनिक गाणी आणि आताचे नावीन्यपूर्ण तंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता, अशा अनेक नव्या गोष्टी आणि प्रकार आपण स्वीकारले, आत्मसात केले... अगदी अंतराळात झेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवले; पण दृश्यकलेच्या बाबतीत आपली अभिरुची अथवा मानसिकता बदललेली नाही. अजूनही आपण दृश्यकलेच्या बाबतीत कालपरत्वे बदल स्वीकारलेला नाही.

‘ही जी काही मॉडर्न अथवा अमूर्त चित्रकला आहे त्यातले आपल्याला काही कळत नाही’ हे वाक्य सर्रास ऐकिवात येते; पण त्या चित्रकलेचा पाठपुरावा कधी केलात का? कधी वाचन केलेत का? कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलात का? कधी चित्रकाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलात का? तर नक्कीच ‘नाही’ हेच उत्तर मिळेल. भिन्न प्रवाह व त्यातून निर्माण होणारे कलामूल्य, मग ती भारतीय असोत अथवा पाश्चात्त्य, काळानुसार बदलत जाते व पुढच्या काळाच्या पाऊलखुणा दाखवत असते. त्या पाऊलखुणा समजून घेण्यासाठी काही प्रमाणात सायास घेतले गेले पाहिजेत. इतिहासाची पाने वाचून एखादे प्रकरण अथवा शैलीवर चिंतन करणे आणि त्यातील मर्म शोधणे हा महत्त्वाचा घटक मानला पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.