- पी. व्ही. राजगोपाल, saptrang@esakal.com
तरुण पिढीला महात्मा गांधीजी यांचं जीवनकार्य आणि संदेश याची ओळख व्हावी, या उद्देशानं फार पूर्वी, १९६९ मध्ये रेल्वेगाडीचं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ही रेल्वेगाडी भारतभर फिरली. त्या प्रदर्शनात माझाही सहभाग होता. जातीय सलोखा, गरिबी, राष्ट्रीय एकात्मता या आणि यांसारख्या समस्यांबाबत महात्माजींना किती आस्था होती, हे तरुण पिढीला समजावं हा त्या प्रदर्शनामागचा प्रमुख हेतू होता.