मौलिक ऐतिहासिक दस्तऐवज!

मराठा साम्राज्याचा इतिहास अतिशय उज्ज्वल आणि देशव्यापी आहे. अटकेपार मजल मारण्यासह पराक्रमांच्या अनेक गाथा त्यांच्या नावे आहेत
original historical document maratha community history of maharashtra
original historical document maratha community history of maharashtraSakal
Updated on

मराठा साम्राज्याचा इतिहास अतिशय उज्ज्वल आणि देशव्यापी आहे. अटकेपार मजल मारण्यासह पराक्रमांच्या अनेक गाथा त्यांच्या नावे आहेत. मात्र, या पराक्रमाविषयी महाराष्ट्राबाहेरील अमराठी वाचकांमध्ये बरेचसे अज्ञान आहे. मराठ्यांच्या इतिहासाबाबत इंग्रजीत झालेले लेखनही असंतुलित आहे.

ही उणीव दूर करण्याच्या उद्देशातून लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांनी इंग्रजीतून इतिहासविषयक लेखनास सुरुवात केली. त्यांच्या या लेखन मालिकेतील मूळ इंग्रजी असलेले ‘Mastery of Hindustan : Triumphs and Travails of Madhavrao Peshwa’ हे सातवं पुस्तक ‘माधवराव पेशवे यांचे विजय व व्यथा’ या नावानं मराठीत वाचकांपुढं आलंय.मराठी अनुवाद डॉ. विजय बापये यांनी केला आहे.

‘‘ युरोपातील पुस्तकांच्या दुकानातील किमान एक तृतीयांश दर्शनी भागात इतिहासासंबंधी पुस्तके दिसतात. मुख्य म्हणजे, या पुस्तकांचं लेखन लोकांना रस निर्माण होईल, अशा रंजक पद्धतीनं केलेलं असतं. मात्र, भारतात स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचं लेखन अतिशय नीरस पद्धतीनं झालंय.

इतिहासाचं लेखन, इतिहास शिक्षणाची पद्धत यावरून अनेक वादविवादही झाले. यामुळं विद्यार्थ्यांचा इतिहासातील रस संपला,’’ अशी खंत ज्येष्ठ इतिहासकार व लेखक डॉ. स्वपन दासगुप्ता यांनी व्यक्त केली होती.

याची आठवण व्हायचं कारण म्हणजे डॉ. उदय कुलकर्णी लिखित ‘‘Mastery of Hindustan: Triumphs and Travails of Madhavrao Peshwa’ या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली होती. पण या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचल्यानंतर विद्यार्थ्यांचा इतिहासातील रस वाढेल असा विश्‍वास वाटतो.

माधवराव पेशवे यांचा काळ या पुस्तकातून उलगडला आहे. पानिपतच्या युद्धानंतर झालेलं अपरिमित नुकसान, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आलेली पेशवेपदाची जबाबदारी आणि परकीयांसह अंतर्गत बंडाळीचं आव्हान,

अशा खडतर परिस्थितीत माधवराव पेशवे यांनी पेशवेपद स्वीकारलं. या सर्व आव्हानांचा समर्थपणानं मुकाबला करत त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी दिली. हे पुस्तक म्हणजे माधवराव पेशवे यांचं चरित्र नसून, त्यांच्या काळात घडलेल्या सर्व ऐतिहासिक घडामोडींचा दस्तऐवज आहे.

ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन करताना मी चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्या काळाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वीचं पुस्तक पेशवे पहिला बाजीराव यांच्या काळावरचं होतं.

त्यानंतर नानासाहेब पेशवे व पुढं पानिपतच्या शेवटच्या लढाईपर्यंतच्या काळावरची पुस्तकं लिहिली. आता प्रकाशित झालेलं पुस्तक हे माधवराव पेशवे यांच्या कालखंडावर आहे. संपूर्ण पुस्तक हे तथ्यावर आधारित असून संदर्भांनी परिपूर्ण आहे. त्यामुळं इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आहेच. मात्र, पुस्तकाचं लेखन ललित पद्धतीने केलं असल्यानं सामान्य वाचकालाही त्यात रस निर्माण होईल, असं लेखक डॉ. उदय कुलकर्णी म्हणतात.

पुस्तकाचं नाव : माधवराव पेशवे यांचे विजय व व्यथा

लेखक : डॉ. उदय कुलकर्णी

अनुवाद : डॉ. विजय बापये

प्रकाशक : मुळा-मुठा पब्लिशर्स, पुणे

(०२० -२५४४२३११, ९३७३८६१६४८)

किंमत : ८९५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.