परिस्थितीला हरवून तिची अनवाणी पाऊलवाट पोहोचली सातासमुद्रापार

Overcoming the situation Vimaltai Acharis bare footsteps reached across the ocean Nashik News
Overcoming the situation Vimaltai Acharis bare footsteps reached across the ocean Nashik Newsesakal
Updated on

महिला म्हणून कुटुंबाचा गाडा ओढताना परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीलाच तोंड देत ती उभी असते. कुटुंबाला जपत असतानाच सर्वार्थाने ती अनेक समस्यांवर मात करत सर्जनशीलतेतून (Creativity) स्वतःलाच घडवताना समाजासाठीही योगदान देत असते. आयुष्यात आलेल्या बिकट परिस्थितीत खचून न जाता त्यावर मात करत स्वतःच्या कर्तृत्वाने जगाच्या नकाशावर (World Map) नाव कोरलंय त्या चाकोरे येथील कृषिकन्या विमलताई आचारी यांनी...

विमल जगन आचारी... शिक्षण आठवी... माहेर दिंडोरी (Dindori) तालुक्यातील धागूरचे, तर सासर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे-बेजे येथील... वडील तुकाराम दगू मुकणे यांचे पत्नी, मुलगा आणि विमल मुलगी असे चौकोनी कुटुंब... विमलताईंना आठवत नाही तेव्हाच आई देवाघरी गेली... पायात चप्पल नाही... अशा परिस्थितीत शिक्षणाची दारे ठोठावत धागूरला चौथीपर्यंत, तर दरी येथे पाचवीपासून प्रवेश घेतला. कुटुंबात तिच्यासाठी आधारच असलेली आई गेल्याने तिच्यातील तळमळीची काका निवृत्ती आणि काकू लक्ष्मीबाई मुकणे यांना जाणीव होती. त्यांनी विमलताईंचा सांभाळ केला. डोक्याला तेल नाही, पायात चप्पल नाही, शिकून सावरून काहीतरी करण्याची जिद्द होती, मात्र परिस्थितीची साथ अनुकूल नव्हती. अशा परिस्थितीत काका-काकूंनी विमलताई यांना मुलगी म्हणून सांभाळ करत असतानाच लग्नाची जबाबदारी १८८४ मध्ये पार पाडली.

Overcoming the situation Vimaltai Acharis bare footsteps reached across the ocean Nashik News
Success Story : टेम्पोचालकाच्या मुलाची नोकरीसाठी परदेशवारी

सासरी जगन गंगाराम आचारी यांचेही शिक्षण जेमतेमच... आचारी परिवारही शेतीशी नाळ जोडलेला. मुळातच जन्मापासूनच कृषिकन्या राहिलेल्या विमलताई याही लग्नानंतर चाकोरेत रमल्या. १०० सदस्यांचं खटलं असलेल्या पेगलवाडी आचारी परिवारातील विमलताई या सदस्या होत्या. मात्र चाकोरेत शेती कसण्यासाठी मिळाल्याने पतीसह त्यांनी स्थलांतर केले. याच काळात मुलगा विजय आणि अनू यांच्यानिमित्ताने घरातील सदस्यसंख्या वाढली. परिस्थिती जेमतेम, मात्र कष्टाला देव मानून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून विमलताईंनी घराघरांत विश्वास निर्माण करत चक्रतीर्थ स्वयंसहायता बचतगटापासून आपल्या कार्याला सुरवात केली. प्रारंभी दरमहा पन्नास रुपये असणारी बचत कालांतराने काही हजारांत पोचली. याच काळात कृषी विज्ञान केंद्र आणि तनिष्का व्यासपीठाने दत्तक घेतलेल्या चाकोरे गावाने विमलताईंच्या माध्यमातून गावाचे नाव पुढे झळकले.

Overcoming the situation Vimaltai Acharis bare footsteps reached across the ocean Nashik News
खवा विक्रीतून 'तिने' निर्माण केली स्वतःची ओळख

सरपंचपदापासून ते थेट सन्मानापर्यंत...

विमलताई सरपंच असतानाच्या काळात गाव व परिसरात चराईबंदी, तसेच कुऱ्हाडबंदीच्या लोकसहभागातील निर्णयाने गावाला पर्यावरणविषयक कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आधुनिक शेती करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देत कृषी विज्ञान केंद्राने विमलताई, तसेच बचतगटाच्या सदस्यांनी गिरिराज कोंबड्या, आंब्याची उच्च जातीची झाडे, भातलागवडीची जोमदार पद्धत, पेरूची झाडे, खतनिर्मिती करणारी झाडे, उसातील आंतरपीक घेतलेले बटाट्याचे पीक आदींसह अन्यही विविध प्रयोग राबविण्यासाठी सहकार्य केले. यातच ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाचेही त्यांना पाठबळ मिळत गेले.

स्थानिक सत्कारापासून ते थेट स्वामिनाथन पुरस्कारापर्यंत मजल

तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख म्हणून काम करत असतानाच विमलताई यांनी शेतात १५० काजूची झाडे, १२ गयी, गांडूळखत निर्मिती प्रकल्प, शेडनेटमधील मिरचीची लागवड आदींसह वेगवेगळे प्रयोग शेतीत यशस्वी केले. विमलताई यांच्या शेतीतील प्रयोगांची दखल घेत त्यांना जंगलसंवर्धनसाठी शासनाचा पुरस्कार, हागणदारीमुक्तीसाठीचा पुरस्कार २०१३ मध्ये, ‘सकाळ’ समूहातर्फे सन्मान, २०१५ मध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार मिळालाय. याशिवाय राष्ट्रीय पातळीवर (National Level) अतिशय मानाचा समजला जाणारा डॉ. स्वामिनाथन पुरस्कार देऊनही त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. १ मेस महाराष्ट्रदिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे राजमाता जिजाऊ कृषिभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

आयुष्याच्या वाटचालीत प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःची ओळख उभी करताना संकटांवर मात करत मिळवलेले यश पाहताना पती जगन आचारी, सासरे गंगाराम, सासूबाई सुंदराबाई यांच्यासह आचारी परिवार, तनिष्का व्यासपीठाने दिलेल्या पाठबळामुळेच मी आज स्वतःला सिद्ध करू शकली, हे सांगताना मात्र त्यांना अश्रूही आवरणे कठीण बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.