- प्रा. महेंद्र दामले, saptrang@esakal.com
चित्रकार राजा रविवर्मा यांच्यावर बरंच लिहिलं गेलं आहे. त्यांच्यावर एका सिनेमाचीही निर्मिती झाली. त्यांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांनी, भारतीय पुराणकथांविषयीच्या चित्रांनी, देवी-देवतांच्या चित्रांनी गेली अनेक दशकं चित्ररसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. केरळी लोक, तसंच पुराणातल्या व्यक्ती किती सुंदर दिसतात हे उमजावं, लक्षात यावं यासाठी जणू काही हा आरसाच त्यांनी त्यांच्या चित्ररूपानं आपल्यासमोर ठेवला.