- केतन पुरी, ketan.author@gmail.com
आपल्या राज्याच्या प्राचीन इतिहासाला वैभवशाली करण्यामागं पैठण शहरानं अनन्यसाधारण भूमिका निभावली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आद्य सम्राट म्हणून गणलं जाणारे सातवाहन सम्राट पैठण नगरीशी आपली जवळीक दर्शवतात. पैठणला ‘दक्षिणेची काशी’ असं संबोधलं गेल्यामुळं त्याचं सांस्कृतिक तसंच धार्मिक महत्त्वही अधोरेखित होतं.