अडचणीत सापडला आहात ? आता काहीच होऊ शकत नाही ? सर्व मार्ग बंद झालेत... हे अशक्यच आहे ? अशी भावना मनात निर्माण होतेय... विचारांचे काहूर माजलेले असेल त्या वेळी शीतल देवी या १७ वर्षीय मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणा... मार्ग सापडेल, पर्याय मिळू लागतील हे नंतरचं पण त्या अगोदर उमेद जागी होईल, जिद्द सक्षम होईल.