अगदी सहा महिन्यांच्या बाळांना मोबाईलची सवय लागल्याचे मी पाहिले आहे. मुलांना काहीतरी नव्या गोष्टी शिकाव्यात, त्यांचा भाषिक विकास व्हावा, यासाठी अनेक पालक वेगवेगळी ॲप्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून मुलांना देतात; परंतु मुलांना स्क्रीनची सवय लावण्याऐवजी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर भर देण्याबाबत पालकांना मी समजावून सांगत असतो. पालकांची शिकवण हीच लहान मुलांसाठी उत्तम ॲप आहे.