- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकात साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीतील सप्तपदी, कलश, प्रदक्षिणा, मातृभोजन, जानवं, मौजीबंधन, तसेच वेद-पुराण, महाभारत यातील गाभितार्थ अन् समष्टीशी जोडलेला अन्वयार्थ समजावून सांगितलाय... पोथी-पुराण यांचे बाड देण्यापेक्षा भाईंनी मला ‘भारतीय संस्कृती’ हे साने गुरुजींचं पुस्तक दिलं. समतेचा, बंधुतेचा संदेश देणारा हा मंत्र भारतीय संस्कृतीने दिला. ही संस्कृती किती उदात्त आहे. ही उदात्त भारतीय संस्कृती आपल्याला पौरोहित्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, असे भाई मला सतत सांगत.