सुंदर किनारे, उच्च राहणीमान

जॉन क्रॅकॉअर हे ६७ वर्षीय अमेरिकन लेखक आणि गिर्यारोहक आहेत. ते सर्वाधिक विकल्या जाणार्‍या नॉन-फिक्शन पुस्तकांचे लेखक आहेत.
सुंदर किनारे, उच्च राहणीमान
Updated on

जॉन क्रॅकॉअर हे ६७ वर्षीय अमेरिकन लेखक आणि गिर्यारोहक आहेत. ते सर्वाधिक विकल्या जाणार्‍या नॉन-फिक्शन पुस्तकांचे लेखक आहेत. ‘Into The Wild’ नावाचे पुस्तक त्यांनी १९९६ मध्ये लिहिले आणि ते सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक ठरले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ सह जगभरातील विविध वृत्तपत्रांनी या साहसी पुस्तकाची दखल घेतली. पुढे २००७ मध्ये ‘Into The Wild’ नावाचा चित्रपट आला. तो जगभर प्रचंड गाजला. आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट पहिला असेल. आजही तो चित्रपट कधीही पाहिला तर नवीन काहीतरी शिकायला मिळतं. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर राहणारा तरुण मुलगा पदवीधर होतो, त्याच्याकडे असलेले चोवीस हजार अमेरिकन डॉलर एका सामाजिक संस्थेला दान देतो, स्वतःचे अलेक्झांडर सुपरट्रॅम्प असे नामकरण करुन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून त्याचा प्रवास सुरु करतो. खिशात काहीच पैसे नसताना दोन वर्षे प्रवास करुन अलास्का येथे पोहोचतो. तिथे राहतो आणि शेवटी उपासमारीने मरतो. असा काहीसा आशय असलेला हा चित्रपट आहे. आपण जर स्वतःला प्रवासी म्हणवता आणि हा चित्रपट बघितला नसेल तर तो बघितलाच पाहिजे.

“The core of man''s spirit comes from new experiences,” असे जॉन क्रॅकॉअर म्हणतात. आपला आत्मा अनुभवांनी तृप्त होतो. अनुभवांसाठी नवनवीन गोष्टी केल्या पाहिजेत आणि कधी कधी तर काहीच न करतासुद्धा जगता आलं पाहिजे... अगदी निवांत, निखळ अन् निश्चिंत...! तर मित्रांनो असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी कतार (Qatar) या देशाला भेट दिली पाहिजे. ‘Experience A World Beyond,’ असं कतार पर्यटनाबद्दल बोललं जातं. कतारची लोकसंख्या जवळपास एकोणतीस लाख असून तिथे अरेबिक ही प्रमुख भाषा आहे. जसा आग्नेय आशिया भारी तसाच मध्य पूर्व आशिया ही भन्नाट आहे. मागील आठवड्यात मी ओमानबद्दल लिहिले होते. त्यापूर्वी एकदा संयुक्त अरब अमिरातीबद्दलही लिहिले होते. या देशांचा वारंवार उल्लेख याचसाठी करतोय कारण इथे गेले पाहिजे. अगदी कमी कालावधीत मध्य पूर्व आशियातील देशांनी त्यांचा विकास केलाय. सर्वांनी या देशांचा निश्चितच अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं.

कतारची राजधानी दोहा (Doha) आहे. कतारमधील नागरिकांना ‘सलाम’ म्हणून सहज संवाद साधता येतो. तेथील नागरिक हिंदी देखील बोलतात. बरेच भारतीय कतारमध्ये कामानिमित्त तिथे स्थायिक झाले आहेत. कतारच्या राज्यकर्त्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रादेशिक, आर्थिक राजधानी म्हणून, तसेच तेल-समृद्ध आणि गल्फ ग्लॅमरसाठी दुबईचे प्रतिस्पर्धी म्हणून ठामपणे ठेवण्याचा निर्धार केला आहे. देशाची महत्त्वाकांक्षी दृष्टी दोहामध्ये पाहण्यासारखी आहे, जिथे सांस्कृतिक घडामोडी, आकर्षक हॉटेल्स आणि प्रतिष्ठित गगनचुंबी इमारती शहरभर उभ्या राहत आहेत आणि आर्ट गॅलरी आणि संग्रहालयांमध्ये मोठी गुंतवणूक केली केली आहे. जे येथे अधिक पारंपरिक गल्फ अनुभव शोधत आहेत त्यांचा भ्रमनिरास होणार नाही कारण येथे एक नूतनीकरण केलेला सॉक आहे (फाल्कन क्षेत्र), वाळूच्या ढिगाऱ्यांमधील वाळवंटातील सहल, प्राचीन दगडी कोरीव काम आणि अर्थातच, पर्यटनासाठी भरपूर ठिकाणे आहेत. कॉफी प्रेमींसाठी पारंपरिक ‘कडू अरबी कॉफी’ आहेच.

कतारमधील भयंकर उष्णता आणि दमटपणा टाळण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हे प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम महिने समजले जातात. ५ जून २०१७ ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत Qatar Diplomatic Crisis म्हणजेच काही राजनैतिक संकटे चालू होती. गल्फमधील काही देशांनी कतारवर बहिष्कार टाकल्यासारखे चित्र होते, परंतु आता सर्व सुरळीत होईल असं दिसतंय. पुढील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात फिफा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होणार असून तिथे जोरदार विकासाची कामं चालू आहेत. त्यासाठी जगभरातून तरुणांना काम करण्याची संधी कतार मध्ये उपलब्ध आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कतारची दारं खुली आहेत.

Al Zubarah हे पुरातत्व स्थळ जागतिक वारसा ठिकाणं यादीत समाविष्ट आहे. नाविन्यपूर्ण वास्तुकला आणि जुन्या शैलीतील बोटींसह ७ किमीच्या वॉटरफ्रंट अल-कॉर्निश (Al-Corniche) येथे बघण्यासारखा आहे. आखाती पाण्यात आधुनिक अभियांत्रिकीच्या दुबईच्या पराक्रमांना दोहाचे उत्तर म्हणजे ‘पाम ट्री आयलंड’ आहेत. उत्तम मशिदी, वैभवशाली समुद्रकिनारे आणि उथळ पाण्यावर असणारे फ्लेमिंगोज् अल-वक्राह (Al-Wakrah) येथे पाहायला मिळतात. जेबेल जस्स्सीयेह येथे हजारो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दगडी कोरीव काम नेत्रदीपक आहे. अल-खोरच्या खारफुटी (Mangroves) आणि बागांमध्ये पक्षी-निरीक्षणाला गेलच पाहिजे. वाळूच्या ढिगाऱ्यांनी वेढलेल्या खोर अल-अदादमध्ये येथे कॅम्पिंग करत शांतपणे रात्रभर झोपता येतं. सुंदर समुद्रकिनारे आणि बेबंद गावांसह कतारचे उत्तरेकडील टोक एक्सप्लोर केले तर तेथील वेगळेपण अनुभवता येईल.

कतारमध्ये, कडक काळी कॉफी पिण्यासाठी तर खाण्यासाठी ‘Labneh’ हा एक दही व चीजचा पदार्थ फेमस आहे. माथाफ हे आधुनिक कलांचे अरब संग्रहालय, लहान मुलांसाठी अस्पायर पार्क, कतारचे राष्ट्रीय ग्रंथालय, बर्झान टॉवर्स, कतारी संस्कृती दाखवणारा अल्कूत किल्ला, पर्ल स्मारक, अशी इत्यादी पर्यटन ठिकाणं कतार या देशात आहेत. सन १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या कतारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा जगातील सर्वात मोठा साठा आहे आणि त्याच्या उत्पादन प्रक्रियेत मोठ्या संख्येने परदेशी कामगार काम करतात. तेल संपत्तीमुळे, देशाचे रहिवासी उच्च राहणीमान आणि सामाजिक सेवांच्या सुस्थापित प्रणालीचा आनंद घेतात. खरं तर कतार स्वतःच्या हिमतीने व जगभरातील लोकांच्या सहकार्याने उभा राहतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

तर मित्रांनो, Into The Wild सिनेमासारखं बेभान होऊन जरी फिरता नाही आलं तरी जॉन क्रॅकॉअर म्हणतात तसे अनुभव घेण्यासाठी फिरा. आशिया खंडात तर लई भारी देश आहेत. चलनाचा विचार केला तर भारतीय २० रुपये म्हणजे कतारी १ रिअल. तसं थोडं महाग आहे पण देश छोटा असल्यामुळे पटकन फिरुन येऊ शकतं. तसेच कतार विमानतळ अत्याधुनिक असल्यामुळे तेथून जगभराशी चांगला विमान संपर्क आहे. कधीही विमान खर्च कमी करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्यातल्या त्यात थोडं बजेट फिरता येतं. एकत्रच २/३ देश करता आले तर उत्तम. प्रवास करताना सतत प्रयोग करत राहायचे, त्याबद्दल चर्चा करायची. कदाचित आपल्याच ओळखीत काही परदेशी स्थायिक माणसे भेटतील. एखादी रात्र त्यांच्याकडे राहिलात तर काही प्रमाणात खर्चही कमी होईल. स्वतःच युक्त्या लढवायच्या. असंच नवनवीन अनुभव घेत प्रयोगशील आणि प्रयत्नशील राहिलो तर प्रवास ‘बजेट’ मध्ये नक्की करता येतो.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’असून ‘डू इट युवरसेल्फ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()