गप्पा ‘पोष्टी’ : ‘लकी’ माणसं!!

‘सर, मी अमुक तमुक बॅंकेतून बोलतोय. तुमचं नाव लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झालंय आणि तुम्हाला आमच्यातर्फे अफलातून ऑफर आहे,’ हा किंवा या टाईपचा किमान एक कॉल दिवसाला येतो!
Luck
LuckSakal
Updated on

‘सर, मी अमुक तमुक बॅंकेतून बोलतोय. तुमचं नाव लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झालंय आणि तुम्हाला आमच्यातर्फे अफलातून ऑफर आहे,’ हा किंवा या टाईपचा किमान एक कॉल दिवसाला येतो! फोन डीएनडीमध्ये रजिस्टर केलेला आहे, तरी येतो. प्रत्येकवेळी भलत्याच कोणत्या नंबर वरून, भलत्याच कोणत्या बॅंक किंवा कंपनीकडून, भलत्याच कोण्या व्यक्तीचा येतो. यात  लकी ड्रॉ असतो, स्पेशल ऑफर असते, प्रचंड कमी किमतीतली कुठलीतरी जमीन असते, अफाट स्वस्तातली फॉरीन ट्रिप असते, ऑलमोस्ट फुकटातला कोटी रुपयांचा इन्शुरन्स असतो. काय वाट वाटेल ते केवळ मी ‘लकी आहे’ म्हणून मला ऑफर केलं गेलेलं असतं!! गेली  दहा-पधरा वर्षं मी असाच लकी आहे, म्हणून मला सारख्याच अशा ऑफर्स येत असतात! अर्थातच अशा ऑफर्स म्हणजे फोनवरून बँक किंवा कार्ड डिटेल्स घेऊन आपल्याला लुबाडण्याचे राजमार्ग असतात हे लक्षात यायला लागलं नंतर नंतर.

आधी आधी राग यायचा यांचा. आपण काहीतरी कामात गढलेलो आहोत आणि मधेच फोन करून हे ‘थायलंडची ट्रीप फ्री आहे’ असं सांगतात. मग चिडायचो, शिव्या देऊन फोन बंद करायला सांगायचो. चिडलो की काही जण चवताळून पुन्हा पुन्हा फोन करत राहायचे! मग न चिडता, शांतपणे ‘मला इंटरेस्ट नाही, तुमच्या ऑफरमध्ये. माझं नाव तुमच्या लिस्ट मधून काढून टाका प्लीज,’ असं शांतपणे सांगायला लागलो. हे बऱ्याचदा चालून जातं. तरीही पुन्हा त्याच कंपनीतून कॉल आला तर ‘एकदा सांगून तुम्ही ऐकलं नाही आता तुमची पोलिस कम्प्लेंट करीन,’ असं सांगतो. हे बहुसंख्यवेळा चालून जातं.

मला  या कॉल करणाऱ्या पोरा-पोरींविषयी दयाच वाटते हल्ली. ही विशी-पंचवीशीची पोरं-पोरी, कुठंतरी नोएडा किंवा गुरगावच्या कॉल सेंटरमध्ये कामं करणारी. पन्नास लोक बसू शकतील अशा खोलीत शे-दीडशे जण कोंबलेले असतात. प्रत्येकाला दिवसाला दीडशे-दोनशे कॉल्स करायचं टार्गेट असतं. कोणीतरी लिहून दिलेलं स्क्रिप्ट पोपटासारखं घडाघडा बोलून दाखवायचं असतं. कॉल केल्यावर बहुसंख्य लोक तोंडावर शिव्या देतात किंवा कॉल कट करतात. आणि हे सगळं महिना दहा-बारा हजार रुपये कमवण्यासाठी करायचं. काय आयुष्यं असतील या पोरा-पोरींची? का करत असतील ते अशा नोकऱ्या? आपण करतो आहोत ते चुकीचं आहे हे कळत नसेल का त्यांना? हे इतकं बेसिक मूल्य-शिक्षण नाहीसं झालंय का समाजातून? एखादं  खरं प्रॉडक्ट किंवा खरी सेवा विकणं असल्या ह्या फ्रॉड्सपेक्षा सोपं असतं. आणि ते करून चार पैसे कमी मिळतील, पण जे मिळतात ते हक्काचे असतात हे इतकं साधं सत्य या लोकांना का समजत नाही?

अर्थात,  हे समजण्या इतकं शहाणपण ज्यांच्याकडं असतं तेच खरे ‘लकी’ असतात. आणि त्यांनाच असे कॉल्स येत राहातात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.