पेपरच्या आदल्या रात्री फार जागरण करू नका. पुरेशी झोप घ्या. स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार करा. मला आठवेल, मला लिहिता येईल, मी चांगल्या अक्षरात पेपर सोडवेन, हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरणार आहे, याची खात्री बाळगा. पेपरच्या पॅटर्नचा अभ्यास करा. आपण प्रत्येक प्रश्नाला किती वेळ देऊ शकतो, याचं प्लॅनिंग आधीच तयार करा. त्यामुळे वेळ पुरला नाही, ही अडचण आपण दूर करू शकू.
पेपरच्या तीन तास आधी अभ्यास पूर्ण बंद करा. या तीन तासांत आपले मन शांत ठेवा. त्यासाठी आवडीची गाणी ऐकू शकता. अभ्यासापासून डिटॅच होऊन इतर तुमच्या आवडीची कामे करू शकता. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर अभ्यासाची चर्चा इतरांशी करू नका. त्यामुळे टेन्शन वाढते, कॉन्फिडन्स जातो. आपल्या जागेवर जाऊन बसल्यावर डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन रिलॅक्स होईल.
जे प्रश्न खूप चांगले येतात, ते आधी सोडवा. त्यामुळे तपासणाऱ्यांवर खूप चांगले इम्प्रेशन पडते. पेपर सोडवून आल्यावर किती मार्क्स मिळतील याचे कॅल्क्युलेशन्स करू नका. थोडी विश्रांती घ्या व पुढील पेपरचे प्लॅनिंग करा. या गोष्टी अमलात आणल्यात तर तुम्ही परीक्षेत चांगला परफॉर्मन्स देऊ शकाल
- परीक्षेचा काळ आलाय...कसे वाढवायचे मनोबल
परीक्षा देताना...
स्थळ : कुठलेही परीक्षा केंद्र. वेळ : पेपरची. अनेक विद्यार्थी परीक्षा द्यायला आलेले आहेत. सर्वांच्या हाती गाइड्स किंवा नोट्स. प्रत्येक विद्यार्थी एकदा शेवटची रिव्हिजन करण्याचा जिवापाड प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन. काही मुलांचे पालक सोबत आलेले आहेत. मुलांना सतत सूचना देणे सुरू आहे. आज पेपर म्हणून आदल्या रात्री खूप जागरण करून अभ्यास केलाय. झोप दाटलेली असतानाच चिडचिड, टेन्शन, चिंता याचं विचित्र मिश्रण मुलांच्या व्यक्तिमत्त्वात झालंय.
पेपर सुरू होतो. काही मुलांना खूप चांगला अभ्यास करूनही वेळेवर आठवत नाही. काही मुलांना वेळ पुरत नाही. बरीच मुले पेपरमध्ये साध्या-साध्या चुका करून ठेवतात. प्रश्नांचा क्रमांक टाकायला विसरतात. पोटात कालवाकालव होते. सतत लघवीला जावे लागते. हातपाय थरथर कापतात.
एकदाचा पेपर संपतो. हुश्श!
रिझल्ट हाती येतो तेव्हा परसेंटेज अपेक्षेपेक्षा खूप कमी मिळालेले असते. भविष्याबाबत रंगवलेली स्वप्नं धुळीला मिळालेली असतात.
हे सर्व टाळता येते. परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टी अमलात आणल्या तर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स वाढू शकतो.
- कन्सल्टन्ट सायकॉलॉजिस्ट,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल हेल्थ,
शंकरनगर, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.