‘ही युद्धाची वेळ नाही’ आणि ‘युद्धभूमीवर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही’ ही दोन वाक्यं भारताची युक्रेनयुद्धाविषयीची भूमिका स्पष्ट करतात. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच भारतीय परराष्ट्रखात्याकडून वारंवार ऐकवण्यात आली आहेत. त्याचाच उच्चार अलीकडच्या रशियाभेटीत आणि युक्रेनभेटीत पंतप्रधानांकडून झाला. यातून भारताची युद्धातली तटस्थता, तसंच ‘शांततेसाठी दोन युद्धग्रस्त देशांनी चर्चेसाठी एकत्र बसावं,’ ही अपेक्षा व्यक्त केली गेली.