- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com
इंटरनेटमुळं जग जोडलं गेलं, व्यवहार सोपे झाले, संपर्क यंत्रणा जलद झाली, माणसाचं आयुष्य कसं एकदम सोपं होऊन गेलं, जगाच्या कोणत्याही भागात घडणाऱ्या घटनांवर ऊहापोह करण्यासाठी समाज माध्यमं निर्माण झाली, आर्थिक व्यवहार सोपे करण्यासाठी 'फिनटेक' क्षेत्र उदयाला येऊ लागलं आणि त्याच सोबत उदय झाला तो फिनटेक क्षेत्रातल्या गैरव्यवहारांचा.
हे गैरव्यवहार नेहमीच्या बँकिंग क्षेत्रातल्या गैरव्यवहारासारखे असले, तरी त्याचा भर हा जास्त करून तंत्रज्ञानावर असतो, हे गैरव्यवहार ॲपद्वारे किंवा खोट्या संकेतस्थळांद्वारे केले जातात. फिनटेक जसे प्रचलित होत गेले, तसे भारतात या गैरव्यवहारांनी अवघं आर्थिक विश्व व्यापून टाकले आहे. कर्ज देणारी खोटी ॲप्स, भांडवल बाजारात परतावा मिळवून देणारी ॲप्स, एवढंच नाही तर केवायसी करायला देखील रोजच्या रोज ॲप्स निर्माण केली जात आहेत.