पाककृतीला चव यायची तर ‘फोडणी’ हवीच. फोडणी कच्ची राहता कामा नये आणि जास्त जळायलासुद्धा नको. कधीकधी ती ‘मूलभूत’ फोडणी असते. म्हणजे पाककृतीच्या सुरुवातीला. तर कधीकधी असते पदार्थ तयार झाल्यावर ‘बाहेरून’ द्यायची. उद्दिष्ट एकच. पदार्थ चविष्ट करणे. डॉक्टर आणि रुग्ण ह्यांच्या संवादामध्ये येणारी उदाहरणं, दृष्टान्त, चटपटीत किस्से. हे सारे फोडणीचे पदार्थ असतात. नात्याला रुची आली की उपचारांना सहकार्याचे पंख मिळतात.