स्पॅनिशमधल्या इतर लहान मुलांप्रमाणेच त्यालाही फुटबॉलचं प्रेम होतं. गल्लीतील मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यातच तो आनंदी असायचा. पण गंमत अशी झाली, की स्वत: बार्सिलोना क्लबकडून फुटबॉल खेळलेल्या त्याच्या काकांनी त्या लहान मुलाला फुटबॉल नव्हे तर टेनिसचे धडे गिरवायला लावले. वयाच्या पाचव्या वर्षीच प्रशिक्षण सुरू केलं. काका एकदम शिस्त पाळणारे होते. ते त्या लहानग्या मुलाकडून इतकी मेहनत करून घ्यायचे की कधी कधी तो मुलगा टेनिसचे प्रशिक्षण झाल्यावर रडत घरी परतून आईवडिलांना सांगायचा की मला हे झेपत नाही.