जातवार जनगणनेला पाठिंबा देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षाला मोठी मदत केली आहे. संघाचा हा निर्णय राजकीय वर्तुळाला चकित करणारा असला, तरी भाजपाला तो फायदेशीर आणि एकूणच भाजपची जी राजकीय कोंडी झाली होती ती दूर करणारा आहे. जातवार जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी सातत्याने विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे.