हिवाळ्याच्या या दिवसांत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं सृष्टीत एक प्रकारची कुंठीत अवस्था निर्माण होते व त्यामुळं या काळात काहीही उत्तमरीत्या उगवत नाही. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता. जडत्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी आपण दीपावलीचा सण साजरा करतो, जडत्वाचा अंत करतो.
दीपावली साजरी करण्याची आपली संस्कृती ही १२ ते १५ हजार वर्षांपूर्वीची आहे. वर्षाच्या या समयी, सृष्टीतील जीवन जडत्वाच्या अशा स्थितीत येतं जे वर्षाच्या इतर सामान्य गतीत घडत नाही, याचा लोकांना ठाव लागला होता. आपल्या ग्रहाच्या उत्तर गोलार्धात सूर्य एका विशिष्ट स्थानात असल्यामुळं हिवाळा असतो, परंतु सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अशा प्रकारे कार्यरत असते की, सृष्टीत एक प्रकारची कुंठीत अवस्था निर्माण होते. त्यामुळं या काळात काहीही उत्तमरीत्या उगवत नाही. हा देश १२ हजार वर्षांचा शेतीचा इतिहास असणारा बहुधा एकमेव आहे, म्हणून लोकांच्या हे लक्षात आलं, की वर्षाच्या या काळात बी-बियाणे अंकुरत नाहीत किंवा अतिशय हळूहळू अंकुरतात. सृष्टीतील अवघी जीवन प्रक्रिया मंदावते आणि जडत्व निर्माण होते. जडत्व म्हणजे मृत्यू; गतिशीलता म्हणजे जीवन. एक प्रकारे, सृष्टीतील सर्व व्यवस्था प्रणालींमध्ये एक प्रकारचा तात्पुरता मृत्यू घडून येतो. मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता. जडत्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, आपण विविध यंत्रणा विकसित केल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कार्तिक महिन्यात लोक आपल्या घरात चैतन्य राखण्यासाठी दिवे लावत असत. आज आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, पण पूर्वी घरात तेलाचे दिवे वापरत असत आणि लोकांच्या आर्थिक स्थितीमुळं तेव्हा लोक एक किंवा दोनच दिवे लावत असत. परंतु, हा विशिष्ट महिना आल्यावर ते घराच्या प्रवेशद्वारावर आणि आत शक्य तेवढे अधिक दिवे लावत असत, कारण ही अशी वेळ आहे जेव्हा मानवी मन स्वाभाविकपणे नैराश्यावस्थेत जातं किंवा उदास होतं. म्हणून हा दिव्यांचा उत्सव बनला. तर दीपावली फक्त एका दिवसासाठी नव्हती. तर संपूर्ण महिन्यासाठी असायची.
नरक चतुर्दशी
ऐतिहासिकदृष्ट्या दीपावलीला नरक चतुर्दशी म्हणतात. हिवाळ्याच्या महिन्यात तुम्ही सूर्योदयापूर्वी उठणं फार महत्त्वाचं आहे. सूर्याची पहिली किरणे गवत किंवा इतर कृमी-कीटकांवर पडू नयेत - सूर्याची पहिली किरणे तुमच्यावर पडली पाहिजेत. म्हणूनच, सूर्योदय होण्यापूर्वी प्रत्येकजण सूर्याची पहिली किरणे आपल्यावर घेण्यासाठी बाहेर पडतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जडत्व नष्ट करणं. आयुष्य म्हणजे काळ आणि ऊर्जा यांचा खेळ आहे. आपल्या सर्वांमध्ये एक निश्चित वेळ आणि ऊर्जा आहे. वेळ ही आपल्या सर्वांसाठी एकाच गतीनं जात आहे. कोणीही ही गती कमी करू शकत नाही किंवा हा वेग वाढवू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही खूप आनंदी असल्यास तुमचा वेळचा अनुभव खूपच संक्षिप्त असेल. तुम्ही शंभर वर्षं जगलात तरी काही फरक पडत नाही, तो कमीच आहे. मानवांत दडलेल्या शक्यता लक्षात घेता शंभर वर्षं अगदीच नगण्य आहेत. मात्र, तुमच्यात जडत्व निर्माण झालं आणि तुम्ही व्यथित, दुःखी-कष्टी असल्यास अचानकपणे तुम्ही पाहाल, वेळ पुढं सरकतच नाही. चोवीस तास म्हणजे जणू एक युग वाटेल.
फक्त व्यथित लोकच दीर्घ आयुष्य जगू शकतात, पण तुम्ही आनंदी असल्यास जीवन अतिशय संक्षिप्त असेल! तुम्ही पाहाल, एखादा समाज जितका व्यथित असतो, तितकी त्याला अधिक करमणुकीची गरज निर्माण होईल. जिथं लोक आनंदी असतात त्यांना करमणुकीसाठी वेळ नसतो; आनंद त्यांचं आयुष्य व्यापतो. ते पहाटे उठतात आणि त्यांना काही कळण्यापूर्वीच रात्र झालेली असते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दीपावलीला नरक चतुर्दशी असे म्हणतात कारण नरकासुर हा अत्यंत क्रूर राजा होता, ज्याचा श्रीकृष्णानं यादिवशी वध केला. जो सर्वांना नरक देतो तो नरकासुर. पण, दुष्टता ही काही फक्त आसुरांच्या रूपात येणं आवश्यक नाही. म्हणून जडत्व नरक किंवा नरकाचा स्रोत आहे, कारण एकदा जडत्व निर्माण झाल्यावर तुम्ही स्वतःच नरक बनता. तुम्ही काही नरकात जाणार नाही, तुम्ही स्वतःच नरक बनता. अनेक प्रकारे आपण आपल्यात जीवनाचं हे जडत्व येऊ देत आहोत. नैराश्य,
उदासीनता आणि निराशा तुमच्या आयुष्याचं तुम्ही न पाहिलेल्या भूत-प्रेतांपेक्षाही अधिक नुकसान करू शकतात. दीपावली आपल्या आयुष्यात नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करून टाकण्यासाठीचे एक स्मरण आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे
ईशा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.