इनर इंजिनिअरिंग : वाचायला शिकणे

तुम्हाला लोकांना ठराविक प्रकारे वाचता आल्याखेरीज यासाठी दुसरा कुठलाही सोपा उपाय नाही.
Sadguru
Sadgurusakal
Updated on

प्रश्न - आपल्या नेत्यांना पुढच्या स्तरावर जाण्यासाठी आणि आणखी मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी कसं तयार करता येईल?

सद्‍गुरू - लोकांसोबत काम करण्याच्या माझ्या अनुभवातून मला हे दिसलं आहे की, तुम्ही कुणाला केवळ चांगलं काम करत असल्यामुळे वरच्या स्तरावर नियुक्त केलं, तर सर्व आवश्यक तयारी करूनसुद्धा ते अयशस्वी ठरू शकतात, ते केवळ यामुळे की त्यांचे आंतरिक घटक एका वेगळ्या स्तरावर कार्य करण्यासाठी पुरेसे संघटित झालेले नसतात. ईशा फाउंडेशनमध्ये उदाहरणार्थ, कामाच्या एका स्तरावरून दुसऱ्यावर जायचं म्हणजे पूर्णपणे वेगळ्या प्रकारची कौशल्य लागतात. आधीच्या स्तरावर जे काही तुम्हाला ठाऊक होतं, ते या नवीन स्तरावर कुठेच बसत नाही. त्यासाठी एक पूर्णपणे नवीन प्रकारचा मनुष्य लागतो.

तुम्हाला लोकांना ठराविक प्रकारे वाचता आल्याखेरीज यासाठी दुसरा कुठलाही सोपा उपाय नाही. मला ठाऊक आहे की मी ज्या दिशेने बोलत आहे तो एक अस्थिर प्रांत आहे. तुम्हाला साधी सोपी तीन तत्त्व हवी असतात ज्यांच्या आधारावर तुम्ही लोकांना निवडू शकाल. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे अशी तीन तत्त्वं असली, तरी ती तीनही तत्त्व चुकीची ठरू शकतात. एखाद्या मनुष्याला ओळखण्यासाठी तुमच्याकडे वेगळंच काहीतरी लागतं. असंही होऊ शकतं की कुणी मनुष्य सध्याच्या त्याच्या कामात कदाचित चांगली कामगिरी करत नसेल, तुम्ही त्याला नेतृत्वाच्या पदावर ठेवलं, तर अचानकपणे त्याचं कौशल्य उफाळून येतं.

खूप सारी कामं आणि गुंतवणूक असते, तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या मनावर किंवा अंदाजावर विश्वास ठेवून निर्णय घेण्याची जोखीम पत्करू शकत नाही. परंतु मला वाटतं की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं बारकाईने निरीक्षण करणं - त्यांची कामगिरी नाही, त्यांचं काम नाही, ते काय करत आहेत किंवा नाही या गोष्टी नव्हे. फक्त ते कसे बसतात, कसे उभे राहतात याचं निरीक्षण करणं - एक मनुष्य म्हणून त्यांचं निरीक्षण करणं हा एक खूप महत्त्वाचा पैलू ठरतो. तुम्हाला त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या असतील तर. कारण जेव्हा ते मोडून पडतात किंवा ते काहीतरी अयोग्य गोष्ट करतात, तेव्हा तो फक्त त्यांच्या कारकीर्दीचा प्रश्न नसतो; तर त्याने भोवतालच्या सर्व गोष्टींवर परिणाम पडतो. आणि अनेक वेळा, गोंधळ उडाल्यानंतर चूक सुधारणं खूप अवघड बनतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.