पंतप्रधान मोदी आणि कंगना यांच्यामध्ये 'हे' साम्य; याला योगायोग म्हणायचं का?

samrat phadnis write about Prime Minister Narendra Modi and Kangana Ranaut
samrat phadnis write about Prime Minister Narendra Modi and Kangana Ranaut
Updated on

काही गोष्टी घडत जातात. काही ठरवून घडतात. मात्र, काही गोष्टी घडल्यानंतर त्यांना दिशा देता येते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, त्यावरून अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारशी घेतलेला पंगा, बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, या रणधुमाळीत सुशांतसिंहचं बिहारीपण वारंवार जागवणं आणि कंगनाचा हिंदुत्वाचा पुकारा यामध्ये वरकरणी काहीच साम्य नाही. मात्र, त्याला आता पुरेशी राजकीय दिशा मिळालेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एखाद्या कलाकाराचं राजकीय विचारसरणीकडं झुकणं गैर नाही. ते एका रात्रीत होत नसतं, इतकंच. कंगनाचे आवडते राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी. गंमतीचा भाग म्हणजे दोघांच्या गेल्या सहा वर्षांतील वाटचालीत कमालीची साम्यं आढळतात. ही साम्य पाहिली, की गोष्टी घडल्यानंतर त्यांना राजकारणासाठी दिशा देण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे, यावर विश्वास बसू लागतो. 

1. कंगना रनौतचा "क्विन' मार्च 2014 मध्ये रिलिज झाला. सुपरहिट ठरला. कंगना स्टार बनली. तिची आधीची सात वर्षांची स्ट्रगल आता यशकथा बनली. तिचा 2011 चा "तनु वेड्‌स मनू' चांगला चित्रपट होता; कौतुकही झालेलं. पण कंगनाला बॉलीवूडमधलं स्टारडम नव्हतं. 
2. आपण छोट्या गावातली सामान्य कुटुंबातली मुलगी आहोत, हे कंगना वारंवार सांगते. छोट्या गावातली छोटी मुलगी बॉलीवूडची स्टार बनलीय, हे ती ठसवते. 
3. कंगना बॉलीवूडमधल्या नेपोटिझमवर; घराणेशाहीवर तुटून पडते. विशिष्ट कुटुंबातल्या लोकांना बॉलीवूडमध्ये जागा दिली जाते, हे तिनं सांगते. 
4. बॉलीवूड इस्लाम-फ्रेंडली असल्याचा धडधडीत राजकीय आरोप कंगना करते. 

 हेही वाचा : 'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश

कंगनाचे आवडते राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी. तिनं सातत्यानं मोदींचं कौतुक केलंय. लोकशाहीचे सर्वात लायक नेते मोदी आहेत, असं तिनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी म्हटलेलं. 

1. मार्च 2014 ला देशानं नरेंद्र मोदींचा झंझावात पाहिला. त्यांनी देश पिंजून काढला आणि केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले. मोदी पंतप्रधान बनले. त्या आधी तिनवेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाचं कोडकौतुक होत होतं; मात्र ते राष्ट्रीय नेते बनलेले नव्हते. 
2. आपण चहा विकला, वडनागरसारख्या गावात सामान्य कुटुंबातला आपला जन्म, हे मोदी वारंवार सांगतात. सामान्य कुटुंबातला माणूस पंतप्रधान बनला, हे ते दाखवतात. 
3. मोदी कॉंग्रेस पक्षातील घराणेशाहीवर तुटून पडतात. देशावर एकाच कुटुंबाचं सर्वाधिक काळ राज्य होतं, हे गेल्या सहा वर्षांत त्यांनी न चुकता सांगितलं. 
4. शक्‍य त्या ठिकाणी मोदी हिंदुत्वाबद्दल बोलतात. आज देशातील निर्णय प्रक्रियेत हिंदुत्व केंद्रस्थानी आहे. 

 हेही वाचा : कंगना राणावत मुंबईतल्या घरी दाखल, विमानतळावर आरपीआय-शिवसेना भिडली

सुशांतसिंह प्रकरणात कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोदी सरकारने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तिच्यासोबत असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.