कोरोनाच्या महामारीनंतर सर्व खेळ सुरू होत असताना बॅडमिंटनसारख्या खेळाला पुनरागमनासाठी वेळ लागला. गेल्या पंधरवड्यात थायलंड ओपन स्पर्धा झाली; पण कोरोनाचाचणीबाबत पॉझिटिव्ह-निगेटिव्हच्या बऱ्याच घडामोडी घडल्या. भारताची फुलराणी साईना नेहवालबाबत हेच घडलं.
आघाडीच्या स्पर्धेत गणना
थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सन १९८४ मध्ये सुरुवात झाली आणि काही वर्षांतच तिनं जगातल्या प्रमुख स्पर्धेत स्थान मिळवले. थायलंडमधील पर्यटनाला पोषक ठरू शकेल हा विचार करून थायलंड सरकारनं स्पर्धेला कायम पाठिंबा दिला. सन २०१८ पासून जागतिक बॅडमिंटन महासंघानं द्वितीय श्रेणीच्या द्वितीय स्तराच्या स्पर्धेत स्थान दिलं. या प्रकारातील सुपर एक हजार स्पर्धा आहेत. त्यात ऑल इंग्लंड ओपन, चायना ओपन आणि इंडोनेशिया ओपन यांचा समावेश आहे. या स्पर्धा जागतिक आणि ऑलिंपिकच्या खालोखाल समजल्या जातात. जागतिक महासंघाच्या अव्वल श्रेणीच्या स्पर्धेत ऑलिंपिक, थॉमस -उबेर ही सांघिक स्पर्धा आणि जागतिक स्पर्धा आहे. द्वितीय स्तराच्या पहिल्या श्रेणीत केवळ जागतिक मालिकेतील अंतिम टप्प्याची स्पर्धा आहे. त्यापाठोपाठ द्वितीय स्तराच्या द्वितीय श्रेणीच्या स्पर्धा आहेत.
थायलंड ओपन आणि भारतीय
पहिल्याच थायलंड ओपनमध्ये म्हणजे सन १९८४ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी अंतिम फेरीत धडक मारली; पण त्यांना जागतिक विजेत्या सुगिआर्तोविरुद्ध हार पत्करावी लागली. सुगिआर्तो हे थायलंडचे. त्या वेळी सुगिआर्तो यांना किती पाठींबा लाभला असेल याचा अंदाज सहज येईल.
ऑलिंपिक-वर्षातील स्पर्धेत भारतीय खेळाडूचं विजेतेपद हुकलं असलं तरी पहिलं थायलंड-विजेतेपद भारतीय खेळाडूनं ऑलिंपिक-वर्षात जिंकलं. अर्थात्, त्यासाठी २८ वर्षांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. सन २०१२ च्या लंडन ऑलिंपिकपूर्वी एक महिना झालेल्या या स्पर्धेत साईना विजेती ठरली होती. तिनं त्या वेळी थायलंडच्याच रॅचनॉक इनतॅनॉन हिला पराजित केलं होतं. लंडनला साईनानं ब्राँझपदक जिंकलं, तर रॅचनॉक उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
साईनानं विजेतेपदाचा दरवाजा खुला केल्यावर भारतीयांनी या स्पर्धेतील दुष्काळ संपवण्यास सुरुवात केली. किदांबी श्रीकांतनं सन २०१३ मध्ये थायलंडच्याच बून्साक पोन्साना याला हरवून बाजी मारली. तो या स्पर्धेतील भारताचा पुरुष एकेरीतील पहिला विजेता ठरला. चार वर्षांनी बी. साई प्रणीतनं विजेतेपद मिळवलं. दोन वर्षांनी सात्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद जिंकलं. त्यांनी लू जून हुई आणि लिऊ यू चेन या चीनच्या जागतिक विजेत्या जोडीला अडीच तास चाललेल्या लढतीत हरवलं होतं. भारताचं हे सुपर ५०० प्रकारातील पहिलंच दुहेरी विजेतेपद होते. या विजेतेपदानंतर चिराग-सात्त्विकचं जागतिक मानांकन उंचावत गेलं, ते ऑलिंपिकला पात्र ठरण्याची आशा दिसू लागली...पण कोरोनाच्या आक्रमणाने सर्व काही थांबवलं.
सब कुछ आशिया
सहा मिनिटांत निकाल
१८१ मिनिटं लढत आणि त्यापूर्वी
कुरुमी योनाओ आणि नाओको फुकुमान या जपानच्या जोडीला सन २०१६ च्या आशियाई दुहेरी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात हार पत्करावी लागली; पण तरीही त्यांचं सर्वांनी कौतुक केलं. कारण, त्या दोन तास ४१ मिनिटं, म्हणजेच १८१ मिनिटांची लढत खेळून हरल्या होत्या. त्यांना इंडोनेशियाच्या ग्रेसिया पॉल्ली-नित्या महेश्वरी यांच्याविरुद्ध हार पत्करावी लागली होती. इंडोनेशिया जोडीचा विजय होता १३-२१, २१-१९, २४-२२. जपानी जोडीचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे, त्यांनी आपलाच उपांत्यपूर्व लढतीचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्या कोर्टवर होत्या. एक तास ५७ मिनिटं म्हणजेच ११७ मिनिटं. त्यापूर्वीच्या दोन लढतींही एकत्रितपणे दोन तास चालल्या होत्या. या जोडीला बहुदा दीर्घ सामन्यांची सवयच लागली होती. ऑल इंग्लंडमधील त्यांची दुसऱ्या फेरीतील लढत चालली होती १०२ मिनिटं. या लढतीत त्या पराजित झाल्या; पण त्याचं उट्टं त्यांनी स्विस ओपनमध्ये काढताना १०२ मिनिटांत विजय मिळवला होता.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार मात्र...
जगात सर्वात जास्त वेळ चाललेली बॅडमिंटनची लढत २५ तास २५ मिनिटे आणि ४४ सेकंदांची आहे. ऑस्ट्रियातील मारिओ लँगमन आणि थॉमस पॉलवेबर यांनी आपल्या बॅडमिंटन क्लबच्या प्रसिद्धीसाठी ही लढत खेळायचं ठरवलं होतं. ते ही लढत २६-२७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी खेळले.
हे धक्कादायक
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.