एज्यु कॉर्नर : मोबाईल, मुले आणि पालक

K. S. Azad
K. S. Azadesakal
Updated on

लेखक : के. एस. आझाद

आजकाल मुल जन्माला येताच आई-वडिल व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईकांना बाळाचा चेहरा दाखवतात. नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणाऱ्या या पहिल्या प्रसंगातून बाळ मोबाईलशी परिचित होते.

आई-वडिल आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाईलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे, हे नक्कीच बाळांना जाणवत असावे. आता पालकही सतत मोबाइलवर असतात, मुले त्यांचे अनुकरण करतात.

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांना देखील मोबाईलचे व्यसन लागत आहे. पालकांना हे समजायला हवे. पालक मुलांना वारंवार मोबाईल ठेवून दे, असे बजावतातही, पण स्वतःच्या हातातील मोबाईल काही केल्या सोडत नाही.

यासाठी पालकांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. लहान मुलांना मोबाईलची सवय लागण्यासाठी बऱ्याच अंशी पालक जबाबदार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (saptarang latest marathi article by KS Azad on Edu Corner Mobile Kids and Parents nashik news)

जेव्हा लहान मुले रडतात, तेव्हा त्यांना गप्प करण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात. काही पालक मुले जेवत नसतील, तर मोबाइलमध्ये गाणी लावून त्यांना जेवण भरवतात. खरे तर मुलांना इथूनच मोबाईलची सवय लागते.

पुढे ही सवय इतकी वाढते, की याचा मुलांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो. तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. काळानुसार बदललेही पाहिजे पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको.

प्रत्येक गोष्टीचे जितके फायदे, तितकेच तोटेही आहेत, हे मुलांना कोण समजावून सांगणार? खरे म्हणजे ही बाब पालकांनी स्वीकारुन आपल्या वागण्यातून मुलांवर बिंबवायला हवी. 

मैदानी खेळ सुटल्याने मुले शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. कोडी(पझल), बुद्धिबळ, नवा व्यापार, सापशिड्यांसारख्या मनोरंजक व बौद्धिक खेळांची जागा मोबाईलच्या डोक्याने (मेमरीने) चालणाऱ्या गेमने घेतली आहे.

त्याचा परिणाम मुलांच्या बुद्धीच्या विकासावर व कल्पकतेवर होत आहे. विशेष म्हणजे जगभरात या संदर्भात सध्या मोठी संशोधने सुरु आहेत. 

मोबाईल स्क्रीनमुळे डोळ्यांवर आणि रेंजमुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. आई-वडिल दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुले घरी एकटी असतात. अडीअडचणीला सोय म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात.

पण त्यावर कंट्रोल ठेवला नाही, तर मोबाईलचा योग्य उपयोग न होता, मुले गेम्स, चॅटिंग, क्लिपिंग पाहणे यासारख्या गोष्टींमध्ये रममाण होतात. नेट सर्चिगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते, तशी वाईट गोष्टींचीही त्यात भर असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

K. S. Azad
नाट्यजाणिवांचे समृद्ध संचित

वयात आलेली मुले वाईट गोष्टींच्या आहारी जाण्याची शक्यता असते. पालक हल्ली स्मार्टफोनवरील फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपमध्ये गुंतलेले असल्याने मोलाचा वेळ अ‍ॅप्सवर खर्च करतात. त्यामुळे मुले आणि पालकांत संवाद कमी झाला आहे. आपले जग आता मोबाईल कंपन्यांच्या हातात आहे.

काही गोष्टी मोबाईलमुळे खरेच खूप चांगल्या झाल्या. गुगलसारख्या माध्यमातून हवी ती माहिती आज एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते. 

अडीअडचणीच्या प्रसंगी संपर्क साधण्यासाठी मोबाईल उत्तम साधन आहे. लांबवर अगदी दूरदेशी असणाऱ्या जीवलगांबरोबर निरनिराळ्या अ‍ॅपद्वारे सेकंदात दृष्टिभेट होते. त्यामुळे अशा दूरच्या व्यक्तींमध्ये जवळीक साधता येते.

कुठलीही गोष्ट अर्थातच मोबाईल देखील मुलांसाठी वाईट आहे, असे अजिबात नाही. पण त्याचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे. मुलांना मोबाइलचे व्यसन लागू नये, याची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

मोबाईल अतिवापरामुळे बोटे, हात, पाठ, मानदुखीचे आजार मुलांना लहान वयातच जडत आहेत. मोबाईलची सवय लागल्यावर सगळ्यात सुरुवातीला मुले मेसेज टाइप करायला शिकतात. जसजसे मोठे होतात तसे चॅटिंगची सवय लागते.

यासाठी वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊन मुलांची नजर (दृष्टी) सुद्धा प्रभावित होते. बहुतेकवेळ मोबाईलचा सतत वापर केल्याने आणि सोशल मीडियाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातील मित्र व खेळापासून मुले दूर जातात.

त्यांना मोबाईल हेच आपले जग वाटू लागते. मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. काही प्रकरणात तर अनेकांना मानसिक आजार सुद्धा निर्माण झाले आहेत.

आपली बौद्धिक क्षमता मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेचे भान राहात नाही. हळुहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री-अपरात्री झोप येते. झोप पू्र्ण न झाल्याने शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत होऊ लागते. मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने विपरीत परिणाम शरीरावर लहान वयापासून होऊ लागतात. 

शरीर आणि मनाच्या योग्य विकासासाठी पोषक वातावरण हवे. त्यामुळे रेडिएशनचा परिणाम होऊन आरोग्यास धोका उद्‌भवू शकतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल दिसला तर त्याच्यासोबत अनावश्यक ताण येतो. शरीर आणि मेंदूच्या प्रक्रियांमध्ये मोबाईलचा अडथळा निर्माण होतो. 

K. S. Azad
एका लग्नाची आपुलकी

मुलांनी मोबाईलचा अतिवापर करू नये, यासाठी पालकांनी मुलांसमोर मोबाईलचा अतिवापर करू नये, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. रात्री फोनचे इंटरनेट बंद करून झोपा.

नाश्त्याच्या टेबलावर मोबाईलचा वापर अजिबात नको. सकाळी सर्वप्रथम इंटरनेट उघडणे टाळा. दिवसाच्या पहिल्या तासात ते चालू न ठेवण्याचा प्रयत्न करा.

मुलांना मोबाईलचे आमिष दाखवू नका. मुलांना मैदानी खेळ खेळू द्या. अभ्यासावेळी मुलांसोबत बसा. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत जेवण करा.

घरी आल्यावर मोबाईल फोन उंचावर ठेवावा. घरी फक्त अन् फक्त कॉल करण्यासाठी किंवा घेण्यासाठीच मोबाईल वापरावा. मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवावी. यामुळे 

भरपूर फरक पडतो. अलीकडच्या काळात आठवड्यातील एक दिवस 'चिट डे' अशी स्वयंघोषित संकल्पना आपण निर्माण केली आहे. सर्व दिवसांसाठी एकच सवय असावी. 'चिट डे' च्या नावाखाली मोबाईलचा अतिवापर केला जातो.

मुलांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करा, त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागेल. मुलांना एखादा खेळ पण शिकवू शकता. मुलांना मोबाईलची इतकी सवय लागली आहे, की ते मोबाईल शिवाय जेवत नाहीत.

पण आपणही त्यावेळी थोडे कठोर व्हावे. मोबाईलशिवाय जेवावे लागेल, असे सांगावे. सुरुवातीस थोडा त्रास होईल, रडरड होईल पण नंतर आपोआप सवय लागेल.

मुलांना मित्रांबरोबर खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जा. 'खेलेगा, कुदेगा बच्चा तभी बढेगा बच्चा'. अन्यथा मुलांचे खेळणे घरातच होत असेल तर मोबाईलपासून दूर ठेवणे त्रासदायकच होते. 

घरात असताना वाचायला पुस्तके द्या हा सल्ला या चर्चेत पहिला येतोच, पण प्रत्येक मुलाला त्या-त्या वयात वाचनाची आवड असेलच असे नाही, असल्यास अतिउत्तम. अन्यथा नृत्य, हस्तकला, चित्रकला म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस छोट्या छोट्या गोष्टी त्यांना उपलब्ध करुन द्याव्यात. 

(लेखक क्लीफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

K. S. Azad
इंग्रजांचे नामपुराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.