दृष्टिकोन : खेळात देशाला सूर गवसणे गरजेचे 

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

खेळ हा नेहमीच मानवी संस्कृती, समाज आणि प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्यांना टीम वर्क, समन्वय यासारखे विविध महत्त्वाचे गुण अंगी बाणण्यास खेळांमुळे मदत होते.

शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठीही खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळाकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहायला हवे, हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्या देशात चांगले गुणवान खेळाडू असूनही त्यांना हवा तसा वाव अजून मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on khelo india youth games nashik)

Khelo India
Khelo Indiaesakal

जगाच्या पाठीवर बोटावर मोजण्याइतके काही खेळ सोडले तर आपल्या देशाचे खेळांमधील जगातील स्थान अत्यंत नगण्य आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात जागतिक कीर्तीचे खेळाडू निर्माण होऊ शकत नाही, ही फार मोठी शोकांतिका मानायला हवी.

आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत कित्येक पटीने कमी असलेले असे अनेक देश आहेत, की ज्यांचे जागतिक क्रीडा स्पर्धेतील स्थान हे आपल्यापेक्षा कितीतरी वरच्या क्रमांकावर आहे. आपण त्यांच्या आसपास सुद्धा नाही.

यासाठी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशामध्ये खेळाकडे करियर म्हणून बघितले जाते. आपल्याकडे खेळाबरोबरच किंवा खेळाहून अधिक नोकरीस प्राधान्य आहे. या दृष्टिकोनातील अभावामुळे  आपल्याकडे जागतिक कीर्तीचे खेळाडू निर्माण होत नाही. 

केंद्र शासनाने १९८० पासून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात सुरुवात केली. अलीकडच्या काळात खेलो इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून त्यास व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्नही देखील होत आहे.

पण जोपर्यंत शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना खेळांमध्ये करिअर घडविण्यासाठी स्पोर्ट्स स्कूल निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आपण जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात फार मोठी झेप घेऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती ओळखणे गरजेचे आहे. 

अभ्यास किंवा पुस्तके खेळांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत, असे अनेकांचे मत असेलही, पण अभ्यास आणि खेळ दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे मान्य करावेच लागते. सतत काम केल्याने तुम्ही थकत नाही, तर तुमची काम करण्याची क्षमता कमी होते.

म्हणजे अगदी उत्तम पद्धतीने कोणतेही काम करायचे झाल्यास तरी देखील क्षमता विकास आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवा. 

Rajaram Pangavane
नाट्यजाणिवांचे समृद्ध संचित

तंदुरुस्तीसह मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी विविध शारीरिक खेळांमध्ये भाग घेणे अत्यंत महत्वाचे आहे. खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यात उत्तम करिअर घडविणे शक्य आहे, हे आता युवा पिढीला कळू लागले आहे.

मात्र ही समज अधिक व्यापकतेने समाजात पसरायला हवी. खेळ खेळाडूला चांगला खेळ दाखवणासाठी आपली बुद्धी कशी वापरावी, हे शिकण्यास मदत करते. टीमवर्क, समन्वय, विश्वास, नियोजन शिकवते. 

खेळांमध्ये भाग घेणे हे शारीरिक विकासासह मानसिक सक्षमतेसाठी देखील महत्त्वाचे आहे. जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे कौशल्य खेळांमधून आत्मसात करता येते.

खेळात सहभाग आणि प्रयत्न करण्याचे महत्त्व देखील शिकवले जाते. खेळामुळे तणाव देखील कमी होतो. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास खेळ सहाय्यकारी ठरतात. 

खेलो इंडिया हा एक राष्ट्रीय क्रीडा विकास कार्यक्रम आहे. खेलो इंडियामध्ये, संघटित प्रतिभा ओळखणे, संरचित क्रीडा स्पर्धा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे भारताच्या क्रीडा संस्कृतीत शहरी, ग्रामीण भागात क्रीडा प्रकारांचा दर्जा उंचावणे व सुधारणा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

खेलो इंडिया योजना तळागाळात भारताच्या क्रीडा संस्कृतीला बळकट आणि सुधारित करते. खेलो इंडिया कार्यक्रम "सर्वांसाठी खेळ" आणि "उत्कृष्टतेसाठी खेळ"ला प्रोत्साहन देतो. स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रोग्रामद्वारे दरवर्षी सर्व खेळांमधील एक हजार सर्वांत प्रतिभावान खेळाडूंना सहकार्य करतो.

खेलो इंडिया कार्यक्रम ही देशातील क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय योजना आहे. २०१८ मध्ये दिल्लीत तत्कालीन क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरु झाला. देशातील क्रीडा संस्कृतीचा विकास करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.

राष्ट्रीय विकास, आर्थिक वाढ, सामुदायिक विकास आणि वैयक्तिक विकासाचे साधन म्हणून खेळांना मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'राजीव गांधी खेल अभियान' (आधी युवा क्रीडा आणि खेल अभियान म्हणून ओळखले जाणारे) 'खेलो' ला जोडून शहरी क्रीडा पायाभूत सुविधांना मान्यता दिली आहे. शिवाय 'नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च सिस्टम प्रोग्राम'या योजनेद्वारे मान्यता देण्यात आली.

आपल्या देशाच्या शेजारील देश चीनने अवघ्या काही वर्षात खेळामधील महासत्ता म्हणून जागतिक ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही ऑलम्पिक स्पर्धेमध्ये चीन पदक तालिकेमध्ये सतत पहिल्या तीन स्थानांमध्ये आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rajaram Pangavane
एका लग्नाची आपुलकी

चीनचा इतिहास, ओळख आणि राष्ट्रीय अभिमान घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, डायव्हिंग आणि बॅडमिंटनसह अनेक खेळ प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत चीन क्रीडा शक्तीस्थान म्हणून उदयास आला आहे.

प्राचीन परंपरांपासून ते आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणापर्यंत चीनमधील लोकप्रिय खेळांचे आकर्षक जग निर्माण झाले आहे.

अत्यंत कमी वयात लहान मुलांकडून खेळासाठी विशेष प्रयत्न केले जातात. आपल्या देशात शिक्षणाबरोबर खेळ अशी जोड न देता खेळाला दुय्यम महत्त्व दिले जाते, पण चीनमध्ये तसे नाही.

अनेक चिनी खेळाडूंसाठी खेळ ही त्यांची उपजीविका आहे. चीनमधील अनेक मोठे व जगप्रसिद्ध खेळाडू गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. औपचारिक शिक्षण सुरू असताना कठोर प्रशिक्षण ते घेतात. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना सरकार प्रचंड आर्थिक पाठबळ देते.

त्यामुळे त्यांच्यासाठी खेळ हा एक व्यवहार्य करिअरसाठीचा पर्याय आहे. अनेक चीनी खेळाडू काम करत नाहीत ते दररोज प्रशिक्षण घेतात, यावरूनच अंदाज लावता येईल त्यांना त्यासाठी किती सरकारी मोबदला मिळतो.

इतर देशाचे खेळाडू शाळेत जातात किंवा दिवसात सुमारे ६-८ तास काम करतात आणि काही तास प्रशिक्षण घेतात. फरक अर्थातच प्रत्येकाने समजून घेण्यासारखा आहे. भारत सरकारने खेळाडूंचे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य सुनिश्चित करायला हवे.

भारतातील अनेक राष्ट्रीय स्पर्धा विजेत्याला फार कमी रक्कमेची बक्षीस दिली जातात. तरुणांना किंवा त्यांच्या पालकांना व्यावसायिक स्तरावर खेळ घेण्यास प्रोत्साहित केले जात नाही.

भारतीय पदक विजेत्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून भरघोस पगाराचे धनादेश दिले जात असले तरी जे पदक जिंकू शकत नाहीत, ते मात्र वंचित राहतात, असे खेळाडू नियमितपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी लागणारा सर्व खर्च विचारात घेऊन खेळ खेळत राहतील का? लहान पण दुर्दैवी उत्तर 'नाही' असे आहे.

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Rajaram Pangavane
इंग्रजांचे नामपुराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.