लेखक : आर. डी. पाटील
शालेय वर्ष २०२३-२४ साठी शासनाने पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केला आहे. ही पृष्ठे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहेत.
या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे. यात विद्यार्थी स्वतःच्या नोंदी करणार असून, त्यामुळे शिकणे सोपे झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. (Saptarang latest marathi article by RD patil on Now learning easy nashik)
पाठ्यपुस्तकात देण्यात आलेल्या पानांचा वापर, विविध स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ‘माझी नोंद’ यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.
विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी, महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी, वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी ,काही संदर्भ,
वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती/साहित्यांची नोंद घेण्यासाठी, पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी, पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेण्यासाठी दिलेल्या पृष्ठांचा वापर करता येणार आहे.
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न नोंदविण्यासाठी, चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी, पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी, कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी कामासाठी दिलेल्या पृष्ठांचा वापर करता येणार आहे.
नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव, विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद तसेच शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये,
व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे, सहसंबंध लावण्यासाठी,
महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे, रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (पहिली ते पाचवीसाठी), विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसाठी,
विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद घेण्यासाठी, गृहकार्य लिहून घेण्यासाठी, विमर्शी (Reflective) किंवा चिंतनशील मुद्यांची नोंद घेण्यासाठी, अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी पृष्ठांचा वापर करता येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे, तो विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल हे पाहावे.
१. एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
२. पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.
३. नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल. त्यामुळे प्रत्याभरण (Feedback) व दृढीकरण (Fixation) होईल.
४. विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.
५. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना ‘माझी नोंद’ यामध्ये नोंदवता येतील. ६. त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.
७. स्वतःचे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येतील. आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील. ९. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.
१०. पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या-त्या पाठाला जोडून लिहिता येईल.
११. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.
१२. अध्ययनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल व होईल.
१३. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
१४. घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल.
१५. पालकांना वर्गात काय शिकवले आहे, हे समजेल.
पुढील काळजी घ्यावी....
१. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ‘माझी नोंद’ यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.
२. सर्वच शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना ती म्हणजे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली सर्वच विद्यार्थ्यांनी नोंदी समान करण्याचा आग्रह धरू नये. प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे.
३. विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्या नोंदी महत्त्वपूर्ण वाटत आहेत, त्या नोंदी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, त्यासाठी त्यांना मुभा द्यावी.
४. ‘माझी नोंद’ या पृष्ठावर नोंदी करण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तारीख नमूद करण्यास सांगावे.
५. एखादा पाठ्यांश कदाचित एका दिवसापेक्षा जास्त दिवस शिकवावा लागतो. अशावेळी प्रत्येक दिवसागणिक तारीख नोंद करण्यास सांगावी.
नोंदी घेण्याची काही उदाहरणे
१. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी....
आठवीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकात ‘आर्द्रता व ढग’ या पाठात कोणत्या ऋतूमध्ये कपडे वाळण्यास विलंब होतो? त्याची कारणे काय असतील? या संदर्भातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवता येतील.
पाचवी My English Book 'Our Solar System' यामध्ये चंद्र, पृथ्वी बोलत आहे. यामध्ये काही भौगोलिक, वैज्ञानिक, शब्दाबद्दल चर्चा होते ते शब्द विद्यार्थी कोऱ्या पानांवर शब्दकोशातून पाहण्यासाठी नोंदवतील.
महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी.
पाचवी काळ परिचय- भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ.
पाचवी अन्नघटक या पाठातील जीवनसत्त्वे, प्रकार व अभावामुळे होणारे आजार.
अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी...
सहावी- इतिहासाची साधने, यामध्ये ‘ताम्रपट हे इतिहासाचे साधन भौतिक साधन आहे की लिखित’? असा प्रश्न नोंदविण्यासाठी
पाचवी- ‘रंग जादूचे पेटीमधले’ ही कविता आहे. ही कविता शिकताना इंद्रधनुष्य म्हणजे काय? इंद्रधनुष्य कसे पडते? त्यामध्ये किती रंग असतात? असे प्रश्न नोंदवण्यासाठी...
- काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती साहित्याची नोंद घेणे. पाचवी ः हिंदी विषयातील कविता नीम कवितेच्या अनुषंगाने विविध औषधी वनस्पती, पर्यावरण याबाबत विविध माहितीची नोंद घेण्यासाठी.
‘कुटुंबातील वृद्धांना घराबाहेर काढले, तर मुलांना शिक्षा झाली’ या वर्तमानपत्रातील बातमीच्या अनुषंगाने पाचवी परिसर अभ्यास भाग- १ पाठ्यपुस्तकातील ‘कुटुंबातील मूल्ये’ या आशयावर चर्चा घेऊन त्या नोंदी लिहून ठेवता येतील.
- पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी ः कोणताही पाठ्यघटक शिकवत असताना त्या अनुषंगाने शिक्षक वर्तमानपत्रे, संदर्भ- साहित्य, विविध प्रसारमाध्यमे, वेबसाइट, याबाबतची माहिती सांगतात. त्या माहितीचे संदर्भ विद्यार्थ्यांनी कोऱ्या पानावर नोंदवावेत...
- पाठ्यपुस्तकांबाहेरील; परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे ः एखादा पाठ शिकवत असताना पाठाच्या अनुषंगाने पाठाबाहेरील माहिती उदा. गणितज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, साहित्यिक, वैज्ञानिक, विविध क्षेत्रांतील शोध, ऐतिहासिक माहिती यांची नोंद घेण्यासाठी.
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे ः आठवी- 'Be The Best' या कवितेमधील 'Muskie' या मोठ्या माशासारखे बनता आले नाही, तरी ‘Bass’ या छोट्या माशासारखे, चैतन्यदायी बना, असा आशय आहे.
हे मासे कसे, कुठे असतील याबद्दल प्रश्न उपस्थित होतील, ते नोंदवता येतील. चौथी परिसर अभ्यास भाग- २ अभ्यासताना विद्यार्थ्यांच्या मनात सुभा म्हणजे काय? होन म्हणजे काय? असे अनेक प्रश्न येऊ शकतात, ते नोंदवून ठेवता येतील...
- चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी ः गणित, विज्ञान, खेळू करू- शिकू, इतिहास व नागरिकशास्त्र, इंग्रजी, भूगोल इ. विषयांच्या अनुषंगाने आलेल्या चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी.
- पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी ः चौथी परिसर अभ्यास भाग- १ मधील माझा जिल्हा, माझे राज्य या घटकांतर्गत विविध पर्यटनस्थळे, राज्य प्राणी, राज्य पक्षी, यांची पूरक माहिती.
कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी. गणित आणि शास्त्र विषयातील उदाहरणे सोडवण्यासाठी, कच्चे काम करण्यासाठी, सूत्र लिहिण्यासाठी गणित सोडवण्याची वेगळी, आलेख काढताना प्रमाण ठरवण्यासाठी, पाढे तयार करण्यासाठी...
- नियम, सूत्रे, घटना संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद ः आठवी इतिहासामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद निर्भेळ का नव्हता? हा प्रश्न.
- सातवी- Parts of speech- वृक्ष तक्ता ः शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे.
पाचवी- Trains - शब्दार्थ- Mail, without fail Mail – मेल, without fail विदाऊट फेल इत्यादी. तिसरी परिसर अभ्यासातील आपल्या गावाची ओळख या पाठात झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्याचे, वस्तूची नावे येतात, अशा गावांची नावे मुलांनी आठवून लिहावीत, असा उपक्रम आहे. या नोंदी विद्यार्थी या पानावर करू शकतात...
- सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे ः सातवी- भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील ऋतूनिर्मिती आणि सूर्याचे भासमान भ्रमण यांचा सहसंबंध लावताना त्यातील मुख्य मुद्द्यांची नोंद करणे.
सातवी- मराठी- शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता ‘वदनी कवळ घेता’ या धड्यांसंबंधी सहसंबंध लावण्यासाठी शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता अन्न टाकून न देणे, वाया घालवू नये, शेतकऱ्यांचे कष्ट ही माहिती लिहिता येईल.
- रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (पहिली ते पाचवी) ः नक्षीकाम, ठसेकाम, मुद्रा इत्यादींपासून कलाकृती तयार करण्यासाठी वापर करता येईल. उदा., पानांचे ठसे, खडबडीत पृष्ठभागाचे गोणपाट, भेंडी, बटाटा यांच्या संकल्प चित्राकृती. गणित सममिती अक्ष काढणे, भौमितिक आकार काढणे इत्यादी.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
- विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचलेल्या स्वत:च्या उदाहरणांच्या नोंदीसाठी ः मराठी- विलोम पदांची सुचलेली उदाहरणे लिहून ठेवतील. उदा ‘हाच तो चहा... चौथी, परिसर अभ्यास (१) - पाठ १९ माझ्या शाळेत कोणत्या सोयी आहेत? हे विद्यार्थी नोंदवून ठेवतात...
- विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद ः सातवी- मराठी भाषेतील कविता ‘थेंब आज हा पाण्याचा’ अभ्यासताना त्याचा सहसंबंध भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान या विषयांशी लावता येईल.
माय इंग्लिश बुक फोर, चौथी- ‘Munnu's Maths’ - या पाठाचा गणिताशी सहसंबंध आहे. सामान्य विज्ञान यातील ‘संतुलित आहार’ या पाठाचा संबंध इतर विषयांशी आहे.
- विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद ः सातवी- मराठी भाषेतील कविता ‘थेंब आज हा पाण्याचा’ अभ्यासताना त्याचा सहसंबंध भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान या विषयांशी लावता येईल. माय इंग्लिश बुक फोर, चौथी- ‘Munnu's Maths’ - या पाठाचा गणिताशी सहसंबंध आहे. सामान्य विज्ञान यातील ‘संतुलित आहार’ या पाठाचा संबंध इतर विषयांशी आहे.
- गृहकार्य लिहून घेण्यासाठी ः मराठी आठवी पक्षी व प्राणी यांच्याशी संबंधित म्हणी शोधून लिहिणे. सातवी- संविधानाची वैशिष्ट्ये- या पाठातील आपल्या ओळखीचे वकील, न्यायाधीश, पोलिस यांच्याकडून अधिक माहिती मिळवून ती नोंदवून ठेवा, यासारख्या उपक्रमासाठीही या पृष्ठाचा वापर करता येईल.
- विमर्शी (Reflective) किंवा चिंतनशील मुद्यांची नोंद ः सहावी- इतिहासातील भारतीय उपखंड आणि इतिहास- भारतातील विविध प्रदेशातील लोकांत कपडे, आहार, सण साजरे करण्याच्या पद्धती यामध्ये कोणते साम्य व फरकाचे मुद्दे आढळतात.
सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘बाली बेट’ या पाठाच्या अनुषंगाने ‘बाली’ बेटावर पक्षी का नाहीत? असा विमर्शी विचार विद्यार्थी करतील.
- अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी ः सहावी- हडप्पा संस्कृती- हडप्पा संस्कृतीतील स्थळ ‘हड्डा’ अफगाणिस्तानसारख्या दूरच्या देशात कसे आढळते? सातवी- मराठीच्या कवितेतील व्यक्तीक्तीनुसार प्रकृती / स्वभाव भिन्न असतो; अशीच भिन्नता क्षुद्र कीटकांच्या जगातही दिसते का?.
- वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदविणे ः सहावी- इतिहासाची साधने, यामध्ये ‘ताम्रपट हे इतिहासाचे साधन भौतिक साधन आहे की लिखित’? असा प्रश्न नोंदविण्यासाठी. पाचवी- ‘रंग जादूचे पेटीमधले’ ही कविता आहे. ही कविता शिकताना इंद्रधनुष्य म्हणजे काय? इंद्रधनुष्य कसे पडते? त्यामध्ये किती रंग असतात? असे प्रश्न नोंदविणे.
- अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी ः सहावी- हडप्पा संस्कृती-हडप्पा संस्कृतीतील स्थळ ‘हड्डा’ अफगाणिस्तानसारख्या दूरच्या देशात कसे आढळते?.
सातवी- मराठीच्या कवितेतील व्यक्तीव्यक्तींनुसार प्रकृती/स्वभाव भिन्न असतो; अशीच भिन्नता क्षुद्र कीटकांच्या जगातही दिसते का?. अशा प्रकारे एकात्मिक पाठ्यपुस्तकातील पृष्ठांवर विद्यार्थ्यांनी नोंदी करणे अपेक्षित आहे.
(संकलन ः आर. डी. पाटील, पंकज विद्यालय, चोपडा. ८९९९६७१६५८, ९८६०५१९००६)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.