नागरी सहकारी बँका व आर्थिक विकास

विविध सहकारी कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण विकासातले महत्त्वाचे स्रोत आहेत, हे टाळून चालणार नाही. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद २०२३-२४ नुकतीच नाशिकमध्ये झाली. त्यानिमित्त...
Maharashtra State Urban Cooperative Banks Council 2023-24
Maharashtra State Urban Cooperative Banks Council 2023-24esakal
Updated on

"महाराष्ट्राचा आर्थिक विकास व्हावा, हे स्वप्न १९६० पासून वेळोवेळी सत्तेत आलेल्या नेत्यांनी पाहिलं आहे. राज्याला दिशा देताना आर्थिक विकास या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांचं एकमत झालं आहे, ही राज्याच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे. पायाभूत सुविधा देण्याच्या निर्णयातला हा प्रमुख भाग होता. याच अनुषंगानं आर्थिक संस्थांची जबाबदारी यानिमित्तानं समोर येते. विविध सहकारी कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण विकासातले महत्त्वाचे स्रोत आहेत, हे टाळून चालणार नाही. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद २०२३-२४ नुकतीच नाशिकमध्ये झाली. त्यानिमित्त..."

- विश्वास ठाकूर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, निमंत्रक, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद २०२३-२४

(saptarang latest marathi article by vishwas thakur on Urban Co operative Banks and Economic Development nashik news)

आर्थिक विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा स्वतंत्र पैलू आहे. खरंतर सामान्य माणसाचं आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशानं सहकारी बँकांची स्थापना झाली. विश्वासार्हता, पारदर्शकता या बळावर त्यांनी अर्थक्रांतीचा यशस्वी विचार प्रत्यक्षात रुजवला.

सर्वसामान्य माणूस आणि सहकारी बँका यांच्या परस्पर सहकार्यातून आज महाराष्ट्राच्या नव्या जीवनमूल्यांचं दर्शन होत आहे. हीच या चळवळीची मोठी उपलब्धी आहे.

सहकाराला आधुनिकतेची जोड मिळाल्यास विकासाची गंगा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सहज होते, हेच यावरून लक्षात येतं. प्रगत राज्य, असा लौकिक संपादन केलेल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक, वैचारिक व सांस्कृतिक वारसाही जोपासला आहे, हेही महत्त्वाचं ठरावं.

सामान्य माणसाचा विकास, कल्याणाचा विचार आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक जगण्याशी निगडित असलेले नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था या एक महत्त्वाचं क्षेत्र आहे.

ही एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच आहे. शिवाय सर्वसामान्यांशी निगडित असलेली ही व्यवस्था देशाच्या सर्वांगीण विकासातही महत्त्वाचं योगदान देत असते.

त्यामुळंच बँकेशी संबंधित आर्थिक सेवा गतिमान करून आर्थिक नियमांचं पालन काटेकोर होणं आवश्यक असतं. व्यवस्थापन पारदर्शक असेल, तरच हे शक्य असतं.

व्यावसायिक परिवर्तन

कृषिक्षेत्र, लघुउद्योग, छोटे व्यापारी यांसह समाजातील प्रत्येक घटकाचं बँकिंग क्षेत्राशी नातं घट्ट विणलं गेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळं बँकिंग क्षेत्राशी संबंधित सेवांचं परिमाणच पूर्णतः बदलून गेलं आहे. त्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक परिवर्तन घडलं आहे.

त्याबरोबर या क्षेत्रातील वित्तीय परिमाणही बदलून गेलं आहे. हा बदल स्वीकारल्यामुळे येणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन बँकांनी महिती व तंत्रज्ञान आधारित धोका व्यवस्थापन पद्धती अमलात आणली आहे.

यात सहकारी बँकांनी आपल्या व्यवस्थापन प्रणालीत आमूलाग्र बदल केले असून, हे बदल आजही सातत्यानं सुरू आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.

दर्जात्मक बँकिंग सेवा, ए.टी.एम. टेलीबँकिंग, इंटरनेट बँकिंग, कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग आदी सेवा देण्यात सहकारी बँका अग्रेसर आहेत. कोअर बँकिंग पद्धतीमुळं बँकांच्या शाखांचं जाळं अधिक विस्तृत आणि कार्यक्षम झालं आहे.

Maharashtra State Urban Cooperative Banks Council 2023-24
जमिनीवरील स्वर्गावर निसर्गाची उधळण

नागरी बॅंक स्थितीवर चर्चा गरजेची

मुक्त आर्थिक धोरणांमुळे खासगी व व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. या बँकांच्या स्पर्धा नागरी सहकारी बँकांना शहरी भागात तरी निश्चितपणे जाणवू लागल्या आहेत. खासगी व विदेशी बँकांनी फक्त शहरी भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

या स्पर्धेत ठामपणे उभे राहण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता नागरी सहकारी बँकांमध्ये निर्माण होणे आवश्यक झाली आहे. अशा परिस्थितीत दुहेरी नियंत्रणाच्या कात्रीत सापडलेल्या व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून जनमानसात ‘विश्वासार्हता’ व

ग्राहकसेवा या बळावर नागरी बँका आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. या सर्व नागरी बँकांच्या स्थित्यंतरात आज या बँकांची नेमकी

स्थिती काय, याचाही विचार करण्याबरोबरच स्थितीगतीचे नेमके विचारमंथन होणेही गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खुल्या आर्थिक धोरणांमुळे प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये ग्लोबल स्पर्धा सुरू झाली आहे.

अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था या व्यापाऱ्यांच्या केंद्रस्थानी असतात. साहजिकच त्यांच्यावरही या स्पर्धेचा परिणाम होणे हे अपरिहार्य आहे.

उत्पादन क्षेत्रासह बदल गरजेचा

बँकांना आपल्या उत्पादन क्षेत्रातही काही बदल करावे लागले. आज तर संगणकीय बदलामुळे ग्राहकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. ग्राहकांना जलद सेवेची अपेक्षा असते.

त्यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, टेलीबँकिंग, मोबाईल बँकिंग, नेटबँकिंग, ईसीएस, एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस बँकिंग, कोअर बँकिंग अशा सेवांबाबत ग्राहकवर्ग सतर्क झाला आहे. या सर्व सेवा देण्याचा सर्वच बँकांचा प्रयत्न असतोच. तरीही ग्राहकांच्या अपेक्षांची मालिका सुरूच असते.

ग्रहाक संबंधाला प्राधान्य

बँकिंग क्षेत्रातील ग्राहकवर्गाच्या बदलत्या आणि वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन बँकांनी आपापल्या ग्राहक संबंधाबाबतचे नियम तयार केले. त्यासाठी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी, संचालक यांनाही विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

ग्राहक संबंध अधिकाधिक वाढवून ते कायम ठेवणे, याला सर्वच बँका प्राधान्य देऊ लागल्या. ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून सर्वंच बँकांना यापुढे आपल्या योजना, नियम आणि कामकाज प्रक्रिया यांचे नियोजन करावे लागणार आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra State Urban Cooperative Banks Council 2023-24
गाजलेल्या खटल्याने कष्टकऱ्यांना न्याय

स्मार्ट बॅंकिंग फायदेशीरच...

अलीकडच्या काही वर्षात बँक ग्राहकांमध्येही बँकिंग कामकाजाबाबत खूपच जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे आता या नव्या ग्राहकांना बँकांची पारंपरिक सेवेची अपेक्षा उरलेली नाही. त्याची आता केवळ आर्थिक फायद्याची अपेक्षा नाही, तर त्याला स्वतःच्या योजनांना अनुरूप अशा बँकिंग सेवा हवी आहे.

त्यामुळेच यापुढे बँकांना ग्राहक समाधानासाठी सक्षम अशीच पावले उचलावी लागणार आहेत. बँकाबँकांमधून मोठी स्पर्धाच निर्माण झाल्याने तर या गोष्टीला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्मार्ट बँकिंगमुळे आपल्या व्यावसायिकतेवर आणि व्यक्तिगत आयुष्यातही मोठे बदल झाले आहेत.

पूर्वी बँकेमध्ये जाऊन पारंपरिक बँकिंग करण्याची पद्धत हळूहळू मागे पडत चालली आहे. स्मार्ट बँकिंगच्या सर्वांत मोठा फायदा म्हणजे आपण ऑनलाइन बँकिंगद्वारे आपल्या खात्याची माहिती कोठेही व कधीही आपल्या संगणकावर अथवा स्मार्ट फोनवर मिळवू शकतो. आपण आपल्या घरातून अथवा व्यवसायाच्या ठिकाणाहून आपले व्यवहार करू शकतो.

घरबसल्या व्यवहार शक्य

ऑनलाइन बँकिंगमुळे आपले व्यवहार सर्वांत जलदगतीने म्हणजे काही सेकंदातच पूर्ण होतात. घरबसल्या आपण सेकंदात ऑनलाइन खरेदी करू शकतो. डेबिट व क्रेडिट कार्डमुळे जसे रोख करू शकतो तसे रोख रक्कम बाळगण्याचा त्रास व धोका कमी झाला.

जवळ कार्ड असल्यामुळे मिळणारी निश्चितता वेगळीच आहे. अनेक बँकांमधून त्यांची संगणक प्रणाली ही खातेदारांच्या संगणक प्रणालीशी जोडली जाते. त्यामुळे खातेदाराला सर्व व्यवहार ताबडतोब पाहता येतात व व्यावसायिक निर्णयप्रक्रिया जास्त सुलभ होते.

स्मार्ट बॅंकिंगकडे तरुणाईचा कल

अनेक व्यावसायिकांच्या एकापेक्षा अनेक कंपन्या व बँक खाती असतात. अशावेळी एखाद्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैशाचे हस्तांतर करण्याची प्रक्रिया जलद पार पाडण्यासाठी स्मार्ट बँकिंगचा मोठा उपयोग होतो.

मुदतीच्या आत सरकारी व इतर देणी देण्यासाठीही या जलद हस्तांतरणाचा मोठा उपयोग होतो. अशा ऑटोमेटेड क्लिअरिंग पद्धतीमुळे देणी जलद पद्धतीने देण्याची सुविधा ग्राहकांना प्राप्त होते.

अशा प्रकारे स्मार्ट बँकिंग आत्मसात केल्यामुळे ग्राहकांना कमालीचे फायदे होत असल्याने स्मार्ट बँकिंगची प्रणाली आत्मसात केलेल्या बँकांमधून व्यवहार करण्याकडे व्यावसायिक व तरुणवर्गाचा कल वाढताना दिसत आहे.

Maharashtra State Urban Cooperative Banks Council 2023-24
पुन्हा पुन्हा तीच चूक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.