सह्याद्रीचा माथा : अमळनेरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद

anil bhaidas patil
anil bhaidas patilesakal
Updated on

अमळनेरची भूमी आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक नगरी म्हणून खानदेशात परिचित आहे. साने गुरुजींमुळे अमळनेर देशभर परिचित आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये अमळनेरचा विकास अनेक कारणांमुळे खुंटला.

त्याला अनेक कारणे आहेत. पण अमळनेरला स्वातंत्र्यानंतर कधीही कॅबिनेटमंत्रीपद लाभलं नव्हतं, जे अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली वाटचाल करणाऱ्या अनिल भाईदास पाटील यांच्या रुपाने अमळनेरला लाभले आहे.

त्यामुळे अमळनेरसाठी आणि जळगाव जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीतमध्ये जळगाव जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य प्रकर्षाने समोर येते, ते म्हणजे सध्या राज्य सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांचे मंत्री हे जळगाव जिल्ह्यात आहेत.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकपेक्षाही जळगाव अधिक हेविवेट झालेले आहे.  (saptarang latest marathi article sahyadricha matha on Amalner first Cabinet Minister anil bhaidas patil post after independence jalgaon political)

anil bhaidas patil
नको गं! नको गं! आक्रंदे जमीन...

अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील एंट्री तशी अलीकडची आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. पण अल्पावधीत त्यांनी अजित पवार यांची मर्जी संपादन केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भूमिपुत्र या मुद्द्यावर रणांंगण गाजवत ते आमदार झाले.

सतत लोकांच्या गराड्यात राहणाऱ्या या नेत्याला तशी मंत्रीपदाची आस अजिबात नव्हती. केवळ अजित पवार यांच्या पाठिशी राहायचं हे मात्र त्यांनी पक्क ठरवलेलं होतं. मात्र या विश्वासू वृत्तीमुळे ज्या नऊ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात अनिल भाईदास पाटील यांचा समावेश झाला.

गेल्या आठवड्यातील घटनाक्रम जसा सगळ्यांसाठी अनाकलनीय होता, तसाच तो अनिल भाईदास यांच्यासाठीही अनपेक्षित होता. काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेलेले असताना अजितदादांचा फोन येतो, आणि ठरलेल्या वेळेत ते आधी देवगिरी आणि नंतर राजभवनात पोहोचतात.

मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर बराच वेळ खरंच असं झालंय का, याचा विश्वासही त्यांना बसत नव्हता, हे ते अगदी खुल्या मनाने कबूल करतात.

शपथविधीनंतर कुठलं खातं मिळेल, याची चर्चा होत असताना त्याची फारशी चिंता अनिल भाईदास पाटील करत नाहीत. कुठले तरी खाते मिळेलच, हे जाणून त्या खात्याला न्याय कसा देता येईल, यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही ते सध्या त्यांच्या चाहत्यांना देत आहेत.

anil bhaidas patil
चुकलेल्या चौकटी

आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेकांची गोची होणार आहे. अमळनेरच्या बाबतीत सांगायचे तर आता माजी आमदार शिरीष चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणात कशा पद्धतीने उतरतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

राष्ट्रवादी आणि भाजपा सोबत असल्यामुळे मैत्रीच्या परिस्थितीत राष्ट्रवादीकडे ही जागा जाईल. त्यामुळे जसे राज्यात अनेक ठिकाणी अटीतटीचे प्रसंग निर्माण होणार आहेत, तशी स्थिती अमळनेरही मध्येही निर्माण होईल.

जळगाव जिल्ह्यात देखील असे बाके प्रसंग येणार निश्चित आहे. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत अमळनेरमध्ये शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असण्याची दाट शक्यता आहे.

किंवा उमेदवारीची मोठी स्पेस निर्माण झाल्यामुळे अन्य पक्षांचा विचार अनेक नेते करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमळनेरमध्ये स्मिता वाघ भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत, त्या आता काय निर्णय घेतात, हे पाहणंही महत्त्वाचे आहे. 

लोक अर्थात मतदार जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतात, त्यानंतर आपल्या भागाच्या विकासाचं काय झालं, हा प्रश्न त्यांच्या मनात सारखा डोकावत राहतो. मग निवडून दिलेला लोकप्रतिनिधी सत्तेत असो अथवा नसो, त्याला निधी उपलब्ध होवो अथवा न होवो, हा भाग लोकांच्या दृष्टिने महत्त्वाचा नसतो, ही वस्तुस्थिती आहे.

ही कारणं लोकांना नंतर सांगताही येत नाहीत. अमळनेरला पाडळसरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अन्यही प्रश्न असले तरी हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मंत्रीपदाचा आणि एकूणच या सरकारसाठी सव्वा वर्षाचा कालखंड शिल्लक आहे, या कालावधीमध्ये या प्रश्नी पुढे वाटचाल गतीमान झाल्यास तालुक्यासाठी आणि परिसरासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

anil bhaidas patil
पत्नीसमवेत पक्ष्यांना दाणे टाकणे सुरू केले अन् चक्क परदेशी पक्षी गोळा झाले.. क्रौंच संवर्धनाचा वसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.