सह्याद्रीचा माथा : हवा ‘बॅक टू बेसिक्स’चा बूस्टर डोस 

Omkaar with Yoga
Omkaar with Yogaesakal
Updated on

मराठीतील नववर्ष जरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात, गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीदेखील संपूर्ण जग ज्यास नववर्ष म्हणून संबोधते, मानते, त्यास आपणदेखील काहीअंशाने मानायला हरकत नाही. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपले सगळेच व्यवहार आपण करत असतो. त्यामुळे नववर्षाचा इव्हेंट आपल्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरतोय. या दिवसाचं महत्त्व संकल्पांच्या अंगानं जाणारं आहे. नवनवे संकल्प करण्याची पद्धत या दिवसाभोवती आहे. (saptarang marathi article by dr rahul ranalkar on booster dose of back to basics nashik news)

Omkaar with Yoga
गुंडाचा गणपती

व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये नववर्षाच्या अनुषंगाने अनेक विनोद व्हायरल होतात. बहुतांश वेळा नववर्षाचे संकल्प हे अवघ्या काही दिवसांत मागे पडतात. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’सारखी स्थिती होते. सगळ्यांनी तब्बल अडीच वर्षे कोविडचा अनुभव घेऊन झालाय. गेले दहा महिने पोस्ट कोविड जगात आपण जगतोय.

विशेष म्हणजे आपण कोविड अनुभवला याची जाणीवही अनेकांमध्ये दिसून येत नाही. त्यात पुन्हा एकदा कोविड आपल्या दारावर येऊन उभा ठाकला आहे. त्यामुळे आता ‘बॅक टू बेसिक्स’चा फॉर्म्युला आत्मसात करण्याची वेळ आली आहे. 

खरं म्हणजे कोविडकाळात जे पॉझिटिव्ह झाले किंवा ज्यांच्या घरातील व्यक्तींना जीव गमवावा लागला, त्यांची कोविडकडे पाहण्याची दृष्टी आणि अन्य लोकांमधील दृष्टी यात मूलभूत फरक जाणवतो. हा फरक मूलतः गांभीर्याशी संबंधित आहे. सध्या चीनमध्ये कोविडचा धुमाकूळ सुरू आहे.

आपल्याला जर आठवत असेल, तर चीनमधील कोविडच्या पहिल्या उद्रेकानंतर सुमारे सहा महिन्यांनी भारतात तो पसरला होता. त्यामुळे या पॅटर्नचा विचार करता आगामी दोन ते तीन महिने आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कोविडभोवती अनेक कथा गुंफल्या गेल्या.

कोविड खरा नव्हता इथपासून ते कोविड फार्मा कंपन्यांचं अपत्य आहे इथपर्यंत. कोविडच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूच्या संख्येबाबतही अनेक मतप्रवाह निर्माण होत राहिले. लोक मरणाच्या दाढेत ओढले गेले, ही वस्तुस्थिती मात्र मान्य करावी लागते. 

Omkaar with Yoga
लंडनमधलं ‘कॅफे डायना’

कोविडने ज्या गोष्टी शिकवल्या, त्यातील महत्त्वाच्या सोडून सोयीच्या गोष्टी आपण हटकून लक्षात ठेवतो. जसं ‘‘घ्या मजा करून आयुष्याचं काय होईल, हे काही सांगता येत नाही.’’ त्यामुळेच की काय यंदाचा ३१ डिसेंबर अभूतपूर्व असा ठरला. बहुतेक सगळी रिसॉर्ट्स, हॉटेल तुडुंब भरून वाहत होती.

हॉटेलमध्ये जेवणे, पार्टी करणे हे अजिबात गैर नाही. पण जीवनात आनंद उपभोगण्यासाठी आता केवळ हेच मार्ग उरले आहेत, ही मानसिकता आता रुढ होत जातेय. ‘बॅक टू बेसिक्स’ ही संकल्पना त्यासाठीच महत्त्वाची ठरते. कोविड जसा चीनमध्ये आधी येतो, नंतर जगभर पसरतो. तसेच काही संकल्पना पाश्चिमात्य देशांत आधी रुजतात, नंतर आपल्याकडे त्या फोफावतात.

‘बॅक टू बेसिक्स’ ही संकल्पना सध्या पाश्चिमात्य लोकांनी डोक्यावर घेतली आहे. या संकल्पनेमध्ये आपल्या ‘मुळांकडे’ जाणं किती गरजेचं आहे, यावर भर देण्यात आला आहे. मुळांकडे जाणं म्हणजे ज्या-ज्या बाबी आयुष्यात मूलतः महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावर अधिक भर देणं.

त्यात नीतीमूल्यांसह पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीचा संबंध येतो. सध्याच्या आभासी जगात न वावरता आपल्या मागच्या पिढ्यांनी ज्या म्हणून काही चांगल्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करणे, यात अभिप्रेत आहे.  

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Omkaar with Yoga
दगडांच्या देशा : आपल्याला भेटलेली माणसे हीच आपली संपत्ती

तसं पाहिलं तर या ‘बेसिक्स’चे निर्माता आपण अर्थात, भारतीय आहोत. शरीर आणि मनाचा अतिशय सखोल असा विचार योगशास्त्रामध्ये भारतीयांनी करून ठेवला आहे. अभिजात संगीताची निर्मिती भारतीयांनी केली आहे. जीवनाच्या सर्वच अंगांचा सर्वांगीण विचार भगवद् गीतेत केलेला आहे.

आहारशास्त्राचा सूक्ष्म विचार भारतीय शास्त्रांमध्ये आहे. आयुर्वेद सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चिंतन, मनन, वाचन, लेखन यांची बाराखडी सध्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या सगळ्यांनी आपल्याकडे गिरवलेली आहे. अभ्यासाच्या या पद्धती सध्या ‘स्कीप’ झाल्या आहेत. जे काय असेल ते झटपट मिळवायचं आहे.

सुखाच्या संकल्पना वेगानं बदलत आहेत. जगाची वाटचाल अधिकाधिक अनिश्चितेकडे होतेय. सर्वसामान्यांचं, गरीब वर्गाचं जगणं कठीण बनत चाललंय. त्यामुळे जगण्याच्या व्याख्यांची, पद्धतींची नव्यानं मांडणी करावी लागणार आहे.

सुखाच्या मागे धावताना खरं जगणं आपण विसरून चाललोय की काय, अशी परिस्थिती घराघरांत दिसून येते. ही स्थिती बदलण्याचा काहीअंशी तरी प्रयत्न सगळ्यांनी करावा, या शुभेच्छांसह इंग्रजी नववर्षाचं स्वागत करू या...

Omkaar with Yoga
शायरीतील वेदांत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.