- संदीप दहिसरकर, director@shilaharaheritageservices.com
‘कला’ हे भवानीसहस्रनामानुसार श्रीजगदंबेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. ‘स्कूल ऑफ आर्ट’ म्हणजेच कलामंदिर. ते या देवतेचं देवालय आहे. या कलादेवतेची उपासना करणारे चित्रकार म्हणजेच ‘कलावंत’. ‘कलोपासना’ही योगसाधना असल्यानं ती साध्य करण्यासाठी चित्रकारानं आपल्या आचरणात नेहमी पवित्रता ठेवावी लागते. पवित्र आचरण ठेवल्याशिवाय कलोपासना यथायोग्य होत नाही.